Download App

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे DK Shivakumar यांच्याकडे ‘इतकी’ संपत्ती

DK Shivakumar Net Worth : कर्नाटकात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly elections in Karnataka) काँग्रेसला (Congress) बहुमत मिळाले आहे. त्यामुळे कर्नाटकसह देशात काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. काँग्रेसच्या या यशात डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांचा मोठा वाटा आहे. दरम्यान, कर्नाटकात कॉंग्रेसला सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून आता मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली. डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. काँग्रेसचे संकटमोटक अशी ओळख असलेले डीके शिवकुमार आता सातव्यांदा कनकापुरा विधानसभा मतदारसंघातून (Kankapura Assembly Constituency) आमदार म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, डीके शिवकुमार यांची एकून संपत्ती तरी किती? याच विषयी जाणून घेऊ.

डीके शिवकुमार सध्या कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे नेते आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यांची थेट सिद्धरामय्या यांच्याशी लढत आहे. डीके शिवकुमार हे राजकारणी तसेच शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. 2006 मध्ये, त्यांनी कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ, म्हैसूर येथून राज्यशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्स पूर्ण केले.

ते कर्नाटक काँग्रेसचे सर्वात श्रीमंत नेते आहेत. त्यांची एकूण संपत्ती, रोकड, जमीन, सोने, कार आणि इतर मालमत्तांबद्दल बोलायचे झाले तर ते कोट्यवधीत बसले आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात डीके शिवकुमार यांनी त्यांच्याकडे अनेक बँक खाती, जमीन आणि रोखे, सोने इत्यादी असल्याचे जाहीर केले आहे.
डीके शिवकुमार यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षांत 68 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ही आकडेवारी त्यांच्या अधिकृत निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. शिवकुमार यांची एकूण संपत्ती आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता पाहिली तर 2023 मध्ये ती 1414 कोटी रुपये आहे. 2018 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमार यांच्याकडे 840 कोटी रुपयांची संपत्ती होती आणि ती 2013 च्या तुलनेत दुपटीने वाढली होती.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी ? संजय शिरसाटांनी केला मोठा दावा; म्हणाले, शिंदे गटाला..

शिवकुमार यांच्यावर अनेक आरोप आहेत. 2019 मध्ये त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकही झाली होती. आता सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग त्यांची चौकशी करत आहेत. ईडी त्याची दोन प्रकरणांमध्ये चौकशी करत आहे. यातील एक प्रकरण नॅशनल हेराल्डशी संबंधित आहे. बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू आहे.
कर्नाटक निवडणुकीपूर्वी ते 104 दिवस तुरुंगात होते. आता ते जामिनावर बाहेर आले आहे. डी. के. शिवकुमार यांच्याकडून काँग्रेसला नवी आशा मिळाली आहे. काँग्रेसच्या चांगल्या दिवसांची ही सुरुवात असल्याचे काँग्रेस नेते सांगत आहेत.

दरम्यान, डीके शिवकुमार यांना वोक्कलिगा समाजाचा कर्नाटकात मोठा पाठिंबा आहे. डीके शिवकुमार हे विद्यार्थी जीवनापासूनच राजकारणात सक्रिय आहेत. 1980 पासून डीके काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत. 1989 मध्ये डीकेंनी सथनूर विधानसभेतून थेट माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांचा पराभव केला होता. 1999 मध्ये पुन्हा त्यांनी आताचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा सथनूरमधून दारुण पराभव केला होता. 2013 मध्ये कनकपुरातून पीजीआर सिंधिया या दिग्गज नेत्यालाही त्यांनी धूळ चारली होती. तर 2023 च्या या विधानसभा निवडणुकीत आर अशोक यांना धोबीपछाड केलं. शिवकुमार यांना 143023 इतके मते पडली. तर आर अशोक यांना 19753 इतकी मते पडली आहेत. शिवकुमार यांनी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री होण्याची आपली महत्त्वाकांक्षा उघडपणे जाहीर केली होती. त्यामुळं आता कर्नाटकचे मुख्यमंत्री पदाची माळ शिवकुमार यांच्या गळ्यात पडणार का, हेच पाहणं औत्सुक्याचं आहे.

 

 

Tags

follow us