डिलिमिटेशनवर भाजपच्या अडचणीत वाढ ; DMK ची भूमिका स्पष्ट, काय आहेत डीएमकेच्या मागण्या?

DMK Demands On Delimitation : केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून या अधिवेशनात केंद्र सरकार डिलिमिटेशन

DMK Demands On Delimitation

DMK Demands On Delimitation

DMK Demands On Delimitation : केंद्र सरकारने 30 नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून या अधिवेशनात केंद्र सरकार डिलिमिटेशन बिल आणणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तर सरकारच्या या विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि डीएमके पाठिंबा देणार असं देखील सांगण्यात येत आहे. तर आता सुरु असणाऱ्या चर्चेदरम्यान डीएमकेचे प्रमुख एम.के,स्टॅलिन (M. K. Stalin) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबतच्या आपल्या मागण्यांवर आपण ठाम असल्याचे आणि त्याबाबत कोणताही तडजोड केली जाणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, डीएमके (DMK) सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहे, परंतु त्यांच्या मागण्यांचा समावेश विधेयकात केला जाईल का, याबाबत त्यांना चिंता आहे. डीएमकेने स्पष्ट केले आहे की, विधेयकातील तरतुदी तपासल्याशिवाय ते पाठिंबा देण्याबाबत कोणतीही वचनबद्धता देणार नाहीत.

डीएमकेच्या मागण्या काय आहेत?

डीएमकेने सरकारसमोर एक अट ठेवली आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेवर असलेला 25 वर्षांचा स्थगिती काळ कायम राहावा आणि सर्व राज्यांमधील लोकसभेच्या जागांची संख्या समान प्रमाणात 50 टक्क्यांनी वाढवावी, जेणेकरून राज्यांचे सापेक्ष प्रतिनिधित्व जैसे थे राहील. जर लोकसंख्येच्या आधारावर लोकसभेच्या जागा वाढवल्या गेल्या, तर ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाच्या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे, त्यांचे नुकसान होईल असं डीएमकेकडून सांगण्यात येत आहे.

लोकसभेतील आकड्यांचे गणित काय ?

जर केंद्र सरकार लोकसभेत विधेयक मंजूर करून घेण्यात यशस्वी झाले, तर राज्यसभेत त्यांना फारशा अडचणी येणार नाहीत. राज्यसभेत त्यांना अतिरिक्त नऊ खासदारांच्या पाठिंब्याची गरज असेल लोकसभेत ज्या पक्षांचा पाठिंबा सरकारला मिळेल, त्याच पक्षांची मदत घेऊन ते राज्यसभेतही आवश्यक आकडा गाठू शकतील. मात्र, लोकसभेत हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला आणखी 36  खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे.

मोहिते-पाटलांचा स्वाभिमान भीमा नदीत टाकला, पराभवाची सवय लागलीय; जयकुमार गोरेंचा हल्लाबोल-

सरकारच्या अंदाजानुसार, त्यांना वायएसआरसीपी (YSRCP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट – NCP-SP) कडून पाठिंबा मिळू शकतो. आवश्यक संख्याबळ गाठण्यासाठी त्यांना डीएमकेच्या 22 खासदारांच्या पाठिंब्याचीही गरज भासेल. सध्या लोकसभेत 540  सदस्य आहेत. सरकारचा दावा आहे की, त्यांना 358 खासदारांचा पाठिंबा आहे, जो दोन-तृतीयांश बहुमतासाठी आवश्यक असलेला आकडा आहे.

Exit mobile version