Download App

Ind-Pak War : भारत-पाकिस्तान युद्धात मध्यस्थी केली? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा खुलासा…

भारत-पाकिस्तान युद्धात मी मध्यस्थी नाही तर मदत केली असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

Donald Trump Speak At India-Pak War : पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती (Ind Pak War) असल्याचं चित्र स्पष्ट झालं. भारत-पाकिस्तानात 10 मे रोजीपासून युद्ध सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर तब्बल 86 तास युद्ध चालल्यानंतर अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पमोठी बातमी! युद्धबंदी घोषणेच्या काही तासांतच…डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत आणि पाकिस्तानला काश्मीरचा प्रस्ताव (Donald Trump) यांच्या मध्यस्थीने दोन्ही देशांकडून युद्धविराम देण्यात आला. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता स्थापन करण्यासाठी मी मध्यस्थी नाही तर मदत केली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलायं. एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी खुलासा केलायं.

पुढे बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मी मध्यस्थी केली असं मी म्हणत नाही, पण परिस्थिती सुधारण्यासाठी मी मदत केली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केलायं. भारत आणि पाकिस्तानात 10 मे रोजीपासून युद्ध सुरु होतं. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी एक ट्विट केलं. यामध्ये ट्रम्प म्हणाले, भारत पाकिस्तान युद्धाला विराम दिला आहे, त्यावर मी खुश असून दोन्ही देशांच्या समझदारीला आणि बुद्धीमत्तेसाठी शुभेच्छा. युद्धविरामाच्या निर्णयाला अमेरिकेने दोन्ही देशांची समझदारी असल्याचं सांगितलं होतं. या निर्णयानंतर अमेरिकेने दोन्ही देशाला शुभेच्छा दिल्या असल्याचं ट्विट ट्रम्प यांनी केलं.

दरम्यान, भारत सरकारकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन केलं असून अमेरिकेने व्यापार थांबवण्याच्या सूचनेनंतर भारत पाकिस्तानला युद्धविरामासाठी मदत केली होती. या युद्धादरम्यान, भारत अमेरिकेत कोणतीही व्यापाराची चर्चा झाली नव्हती, असं भारत सरकारकडून सांगण्यात आलंय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 86 तासांच्या संघर्षानंतर अखेर शस्त्रसंधी करण्यात आली. दोन्ही देशांच्या सहमतीनंतर याबद्दल घोषणा करण्यात आली होती. दरम्यान आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीरसंदर्भात तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांसोबत काम करणार असल्याचं देखील म्हटलं होतं.

Balochistan : मोदींसाठी खास व्हिडिओ, भारत अन् बलुचिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना; कुणाचा पुढाकार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत X हॅंडलवर लिहिलंय होतं की, मला भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा खूप अभिमान आहे. कारण त्यांच्याकडे समजून घेण्याची ताकद, शहाणपण आणि संयम आहे. सध्याच्या आक्रमकतेला थांबवण्याची वेळ आली आहे, त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू आणि विनाश होऊ शकतो. लाखो चांगल्या आणि निष्पाप लोकांना मारले जाऊ शकते. तुमच्या धाडसी कृतींमुळे तुमचा वारसा खूप वाढला आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी कराराची अचानक घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही शेजारी देशांसोबत काम करण्याची ऑफर दिली. त्यावर केंद्र सरकारने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर भर दिला असल्याचं स्पष्ट केलं होतं.

follow us