Balochistan : मोदींसाठी खास व्हिडिओ, भारत अन् बलुचिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना; कुणाचा पुढाकार?

  • Written By: Published:
Balochistan : मोदींसाठी खास व्हिडिओ, भारत अन् बलुचिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना; कुणाचा पुढाकार?

Balochistan Leader Mir Yar Baloch Special Post For PM Modi : भारत आणि पाकिस्तानच्या तणावपूर्ण परिस्थितीत बलुचिस्तानने स्वतंत्र्य झाल्याची घोषणा केली आहे. बलोच नेता मीर यार बलोच (Mir Yar Baloch) याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा केली आहे. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टही करण्यात आली आहे. हे सर्व होत नाही तोच मीर यार बलोचने लवकर भारत आणि बलुचिस्तानमध्ये क्रिकेटचा (Team India) मैत्रिपूर्ण सामना होईल असे संकेत दिले आहे. तसेच हा सामना कुठे होईल याबाबतही लिहिले आहे. मीर यार बलोचने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी खास व्हिडिओदेखील शूट केला आहे.

परदेशी माध्यमांचा सूर बदलला! भारताने पाकिस्तानवर अचूक हल्ले केले, पुरावे देत पाकिस्तानचा केला पर्दाफाश

बलोच नेता मीर यार बलोचची पोस्ट नेमकी काय?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर 13 मे रोजी केलेल्या पोस्टमध्ये बलोच नेता मीर यार बलोच याने लिहिले आहे की, लवकरच, #बलुचिस्तान आणि #भारत क्रिकेट संघांमध्ये दिल्ली किंवा ग्वादरमध्ये एक मैत्रीपूर्ण सामना होईल आणि हा सामना सर्वजण एकत्र एन्जॉय करतील. या पोस्टसोबत मीर यार बलोच यांनी एका क्रिकेट स्टेडियमचा फोटोदेखील पोस्ट केला आहे. ज्यावर बलुचिस्तान हा पाकिस्तान नसून त्याखाली ग्वादर क्रिकेट स्टेडियम असे लिहिण्यात आले आहे.

मोदींसाठी बनवला खास व्हिडिओ

क्रिकेट सामना आणि सामना होणारे ठिकाण याबाबत संकेत दिल्यानंतर बलोच नेता मीर यार बलोच याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास व्हिडिओदेखील शूट करत पोस्ट केला आहे. ज्यात बलुच नेता लिहितोय की, मी # भारताचे माननीय पंतप्रधान @narendramodi यांना ओळखतो. त्यांना निसर्गावर प्रेम आहे. म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी बनवला आहे. सर, मला आशा आहे की हा व्हिडिओ एक दिवस तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि मला खात्री आहे की तुम्हाला #बलुचिस्तानची जमीन नक्की आवडेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

भारतीय चित्रपटांसाठी बलुचिस्तान नेक्स्ट डेस्टिनेशन असेल

मोदींसाठी स्पेशल व्हिडिओ बनवल्यानंतर बलुच नेते मीर यार बलोचने आज (दि.15) मोदींनाच उद्देशून एक पोस्ट केली आहे. ज्यात मीर बलोच यांनी बलुचिस्तान हे भारतीय चित्रपट उद्योगाचे पुढचे पर्यटन स्थळ असेल असे सांगत बलुचिस्तान # तुर्कीपेक्षाही सुंदर असल्याचा दावा केला आहे.


मोदीजी तुम्ही एकटे नाही तर…

एक्सवरील पोस्टमध्ये मीर बलुच यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही एकटे नसून, तुम्हाला 6 कोटी बलुच देशभक्तांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. या पोस्टमध्ये देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनादेखील टॅग केले आहे. ज्यात एकतेला सीमा नसतात. बलुचिस्तानच्या लोकशाही प्रजासत्ताकाचे लोक भारतीयांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी येतात. चीन पाकिस्तानला मदत करत आहे, पण बलुचिस्तान आणि त्याचे लोक हे भारताचे सरकारचे असल्याचे म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube