फक्त भारतच नाही जगातील ‘या’ देशांचाही पाकिस्तान शत्रू; यादीच आली समोर..

Pakistan Enemies List : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप (Pahalgam Terror Attack) पर्यटकांचा मृत्यू झाला. या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन ते हिंदू असल्याची खात्री करुन घेत दहशतवाद्यांवनी त्यांना गोळ्या घातल्या. या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. पाकिस्तान विरोधात (Pakistan Enemies) भारतीयांच्या मनात संताप धुमसत आहे.
देशाची फाळणी झाल्यापासून पाकिस्तान भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. दहशतवादाला पोसणारा देश म्हणून पाकिस्तानची ओळख जगभरात आहे. अनेकदा हे स्पष्टही झाले आहे. 9/11 मधील हल्ल्याचा मूख्य सूत्रधार ओसामा बिन लादेनला अमेरिकेने पाकिस्तानातच मारले होते. तरी देखील पाकिस्तान स्वतःला दहशतवादाचा पोषक म्हणून मानण्यास तयार होत नाही. पाकिस्तानच्या याच दुटप्पी भूमिकेमुळे या देशावर नेहमीच संशय घेतला जातो. फक्त भारतच नाही तर अनेक (India Pakistan Tension) देशांशी पाकिस्तानचं शत्रूत्व आहे. चला तर मग पाकिस्तानचे जगात नेमके किती शत्रू आहेत आणि यामागे काय कारणे आहेत याची माहिती घेऊ या..
फाळणीनंतर पाकिस्तान नावाचा देश जगाच्या नकाशावर अस्तित्वात आला. परंतु, फाळणीनंतर हा देश फक्त स्वतःचा फायदा होईल म्हणून भारताशी लढत आला आहे. प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानचा बंदोबस्त केला आहे. पाकिस्तानचे सरकार कायमच अस्थिर राहिले याचा फायदा तेथील सैन्याने घेतला. आजही पाकिस्तानातील सरकार (Pakistan Army) फक्त नावाला आहे. सैन्यच देश चालवत आहे. याच सैन्याने अनेकदा नेत्यांच्या हातून सत्ता हिसकावून घेतली. आपल्याच नेत्यांना फासावर लटकावणे किंवा तुरुंगात पाठवणे खूप सामान्य गोष्ट आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने केली मोठी चूक; अमेरिकेतून मिळाला अलर्ट
पाकिस्तानला कोणत्याही परिस्थितीत काश्मीर (Jammu Kashmir) हवे आहे. संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तान (United Nations) नेहमीच काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असतो. पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर या हल्ल्याच्या निष्पक्ष चौकशीला आम्ही तयार असल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पण हल्ला तर भारतात झाला आहे मग याची चौकशी भारतीय यंत्रणाच करणार इतरांचा यात काहीच संबंध नाही. परंतु, तरीही पाकिस्तान अशी मागणी का करतोय यामागे पाकिस्तानचा नक्कीच काहीतरी कपटी डाव आहे.
घरच्याच शत्रूंनी पोखरलाय पाकिस्तान
पाकिस्तानात कधीच तेथील सरकार काम करत नाही. सैन्य आणि आयएसआयच येथील खरे आका आहेत. पाळलेले अतिरेकी सुद्धा सरकारचं ऐकत नाहीत. त्यांना कधी सैन्याचं तर कधी सर्वसामान्य नागरिकांचं समर्थन मिळतं. त्यामुळे असे म्हणता येईल की पाकिस्तानला बाहेर शत्रू आहेतच पण देशाच्या आतही अनेक शत्रू आहेत.
सरकारचं देशावरील नियंत्रण कमी झाल्यानंत फक्त 24 वर्षांत पूर्व पाकिस्तान वेगळा झाला. आता हा भाग स्वतंत्र बांग्लादेश म्हणून (Bangladesh) ओळखला जातो. 1971 मधील युद्ध जिंकल्यानंतरही भारताने (India Pakistan War) उदारपणा दाखवला आणि जिंकलेली जमीन परत केली. भारताच्या या उपकाराची जाणीव ठेवण्याऐवजी पाकिस्तानचा भारताच्या जम्मू काश्मीरवर डोळा आहे.
आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन घोषित युद्ध झाले आहेत. अघोषित युद्ध तर सातत्याने सुरुच असतात. परंतु, या सगळ्याच युद्धात पाकड्यांचा पराभव झाला आहे. आता पाकिस्तानातच विद्रोहाचे स्वर तीव्र झाले आहेत. स्वतंत्र देशाची मागणी बलुचिस्तानात (Balochistan) तीव्र झाली आहे. आंदोलने होत आहेत. खैबर पख्तुनख्वात अनेक ठिकाणी दहशतवाद्यांचा कब्जा आहे. येथे त्यांचेच राज्य आहे. त्यामुळे आता जगातील देश पाकिस्तानवर विश्वास ठेवण्यास कचरत आहेत. परंतु, पाकिस्तानी राज्यकर्त्यांत गोंधळ जास्त आहे. न्यूक्लिअर पॉवर म्हणून जगात आम्ही बलवान आहोत असा गैरसमज या लोकांचा झाला आहे. पण या देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. त्यामुळे आयएमएफसह अन्य एजन्सींकडून पाकिस्तानने मोठे कर्ज घेतले आहे.
अफगाणिस्तानशी शत्रूत्व वाढलं
अफगाणिस्तानात ज्यावेळी लोकशाही सरकार होतं तेव्हा पाकिस्तान तालिबानसह अन्य दहशतवादी संघटनांना पूर्ण पाठिंबा देत होता. या दोन्ही देशांत सीमावादही आहे. आता अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या बॉर्डरवर तणाव वाढला आहे. पाकिस्तानी सैन्याला या भागावर जास्त लक्ष केंद्रीत करावे लागत आहे.
इराणबरोबरील संबंधात तणाव वाढला आहे. बलु्चिस्तान आणि इराणच्या सीमा (Iran Pakistan) एकमेकांना लागून आहेत. या ठिकाणी दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे दोन्ही देशांत तणाव वाढला आहे.
अमेरिकेचं तळ्यात मळ्यात सुरुच..
ज्यावेळी ओसामा बिन लादेन पाकिस्तानात होता. तेव्हा अमेरिकेने लादेनला शरण देऊ नका असा स्पष्ट मेसेज पाकिस्तानला दिला होता. तरीही पाकिस्तान लादेन आमच्या देशात नाही असे म्हणतच राहिला. अखेर अमेरिकेनेच एक मोहिम हाती घेतली आणि पाकिस्तानात घुसून लादेनला ठार केलं. यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आला. ज्यावेळी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात होतं तेव्हाही अमेरिकेने तालिबानला मदत करू नका असा इशारा पाकिस्तानला दिला होता.
त्यावेळीही पाकिस्तानने जाणूनबुजून दुर्लक्ष केले. अशा परिस्थितीतह पाकिस्तानचे अमेरिकेशी सैन्य आणि कुटनितीक संबंध कधी तुटले नाहीत. पाकिस्तान सध्या अमेरिकेच्या रडारवर आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पहलगाम हल्ल्याची निंदा केली आहे. इतकेच नाही ट्रम्प यांनी पाकिस्तानने दहशतवादी कारवायांवर आवर घालावा असे म्हटले.
युरोपीय यूनियन आणि पाश्चिमात्य देश
युरोपियन यूनियन दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानकडे संशयाच्या दृष्टीने पाहतो. पाकिस्तानात अल्पसंख्यांकांवरील (हिंदू) अत्याचार आणि बलुचिस्तानात पाक सैन्याकडून सुरू असलेल्या अत्याचारावर युरोपियन युनियनने पाकिस्तावर टीका केली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येते की जगाच्या पाठीवर फक्त भारतच नाही तर आणखीही देश पाकिस्तानचे शत्रू आहेत. तर काही देश शत्रू नसले तरीही पाकिस्तानशी कोणतेच संबंध ठेवत नाहीत.