प्रमोद महाजन यांच्या हत्येवरून आताच कुटुंबात वाद का उफाळला ?
Prakash Mahajan: . प्रमोद महाजन यांची हत्या केवळ ऐशआरामाचे जीवन जगण्यासाठी आणि पैशासाठी झाली आहे. प्रवीण महाजन त्यांना ब्लॅकमेल करत होते.
प्रमोद महाजन हे भाजप ज्येष्ठ नेते, मंत्री राहिलेले. त्यांची हत्या बंधू प्रवीण महाजन यांनी गोळ्या झाडून केलेली. या हत्येप्रकरणी प्रवीण महाजन यांना जन्मठेप झाली. नंतर प्रवीण महाजन यांचा मृत्यू झाला. आता दोघेही ह्यात नसले तरी महाजन कुटुंबात प्रवीण महाजन यांच्या हत्येवरून तब्बल 19 वर्षांनंतर वाद उफाळलाय. हा वाद पुन्हा आताच का उफाळला ? सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde)-धनंजय मुंडेंवर काय आरोप केले आहेत. पंकजा मुंडेंसाठी मामा प्रकाश महाजन (Prakash Mahajan) कसे धावून आलेत हेच आपण व्हिडिओतून जाणून घेऊया…
थोडं आपण फ्लॅशबॅकमध्ये जावू. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राहिलेले प्रमोद महाजन यांची हत्या 22 एप्रिल 2006 रोजी वरळीतील प्लॅटमध्ये झालेली. ही हत्या त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनीच गोळ्या झाडून केलेली. प्रमोद महाजन यांच्या हत्येचे अनेक कारणं सांगितली जातात. कौटुंबिक व आर्थिकवादातून ही हत्या झाल्याचे कारणंही सांगितलं जातंय. प्रमोद महाजन यांची पत्नी रेखा यांच्या कोर्टातील साक्षीनुसार प्रवीण महाजन यांनी पैशाच्या कारणातून ही हत्या केल्याचे सांगितले जाते. परंतु प्रवीण महाजन यांनी मात्र कोर्टात वेगळंच कारण सांगितलं होतं. त्यामुळे हत्या प्रकरणातील काही सुनावणी इन कॅमेरा झाली होती. (dispute erupted in the family over the murder of Pramod Mahajan)
‘कांतारा’ची बॉक्स ऑफिसवर जादू ! दिवाळीत खेचली गर्दी, तब्बल 852 कोटींची कमाई
पंकजा मुंडे राजकारणात बिघडलेली मुलगी-सारंगी महाजन
आता सारंगी महाजन आणि प्रकाशन महाजनांमध्ये प्रमोद महाजन यांच्या हत्येवरून वाद का उफाळला जाणून घेऊ. छगन भुजबळांनी बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यात धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारस असल्याचे विधान केले. त्यावरून प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पंकजा मुंडे ही राजकारणात बिघडलेली मुलगी आहे. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे हे बहिण-भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आलेत. दोघांनी माझीही जमीन लाटली, असा आरोप सारंगी महाजन यांनी केलाय. हे दोघेही गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाहीत. खरे वारसदार बीडमधील जनता व त्यांचे कार्यकर्ते असल्याचे सारंगी यांनी म्हटलंय.
भाचीसाठी मामा प्रकाशन महाजन पुढे सरसावले
त्यानंतर आपली भाची पकंजा मुंडे यांची बाजू घेण्यासाठी प्रकाश महाजन पुढे आले. पण त्यांनी थेट प्रमोद महाजन यांच्या हत्येप्रकरणावर भाष्य करत हत्येचा कारणाबाबत मोठा दावाच केलाय. प्रमोद महाजन यांची हत्या केवळ ऐशआरामाचे जीवन जगण्यासाठी आणि पैशासाठी झाली. प्रवीण महाजन यांना काहीही काम न करता पैसा हवा होता. त्यासाठीच ते भाऊ प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल करत होते. ठाण्यातील अनेक लोकांना याची माहिती आहे. काही आजही जिवंत आहेत, असा दावा प्रकाश महाजन यांनी केलाय. गोपीनाथ मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्याविरोधात साक्ष दिली होती. त्या क्षणापासून एक वैर पेटलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंची बदनामी केली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांनी सारंगी आणि प्रवीण यांच्या नावावर विश्वासाने जमीन घेतली होती. परंतु त्याच जमिनीवरून केस करून पंकजा मुंडेंवर शिंतोडे उडविले जात असल्याचे प्रकाशन महाजन यांनी म्हटलंय.
ज्या केरळ स्टोरीला खोटी कहाणी म्हटले तीच कहाणी मुलीच्या आयुष्यात ठरली खरी; केरमधील धक्कादायक घटना
दोन्ही परिवरातील पैसेवाले प्रवीण महाजनांचा अपमान करायचे-सारंगी महाजन
त्याला सारंगी महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. प्रकाश महाजन यांनी केलेली आरोप निराधार आहेत. हत्येमागील खरे कारण मान-अपमानाची लढाई ही होती. महाजन आणि मुंडे दोन्ही परिवारातील पैसेवाले प्रवीण महाजन यांचा अपमान करत होते. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले होते, असा दावा सारंगी महाजन यांचा आहे. घरातंलच निस्तरता आलं नाही. आमच्या घराला ते सावरू शकले नाहीत. तर देशाला कसे सांभाळू शकले असते, असं म्हणत सारंगी महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केलीय. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे हे मोठे राजकीय नेत आज ह्यात नाहीत. त्यांचे राजकीय कर्तृत्वही अफाट होते. परंतु त्यांच्यावरून महाजन कुटुंबात आरोप-प्रत्यारोप होणे दुर्देवी असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.
