मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल, संपर्क कार्यालयाकडून महत्वाची माहिती
सध्या रुग्णालयात उपचार होत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना लवकरात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.
मंत्री छगन भुजबळ यांना ताकडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Bhujbal) मिळालेल्या माहितीनुसार प्रकृती अस्थस्थ असल्याने त्यांना रुग्णा्लयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्या छातीत दुखत आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार होत आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. छातीत दुखू लागल्याने त्यांना लवकरात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते.
Video : मी दाव्यांना घाबरत नाही! काय करायचं ते करा, अंधारेंचे निंबाळकरांवर पुन्हा गंभीर आरोप
भुजबळ यांना छातीत दुखण्याचा त्रास होत आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांच्या तत्काळ प्राथमिक चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांतून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अँजिओग्राफी केल्यानंतर भुजबळ यांच्या छातीत दुखण्याचे नेमके कारण काय हे समजू शकणार आहे.
दरम्यान, भुजबळ हे पूर्वनियोजित नियमित तपासण्यांसाठी (रूटीन चेकअप) जसलोक रुग्णालय याठिकाणी दाखल झाले आहेत. आवश्यक त्या चाचण्या करून डॉक्टरांच्या सल्ल्याने ते जसलोक रुग्णालय याठिकाणी उपचार घेणार आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून कृपया कोणीही गैरसमज पसरवू नये, त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांनी चुकीच्या बातम्या देऊ नये ही विनंती असं स्पष्टीकरण त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाने दिलं आहे.
