Breaking! मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडली! दसरा मेळाव्याआधीच रुग्णालयात…
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil Admitted To Hospital : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, त्यांना व्हायरल ताप झाला असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लाखो मराठा बांधवांना…
उद्याला नारायण गड येथे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा दसरा मेळावा होणार आहे. हा मेळावा हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर त्यांचा पहिला मोठा सार्वजनिक कार्यक्रम ठरणार आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची (Dasara Melava) हाक दिली होती. याआधी मुंबईत त्यांनी उपोषण करून लाखो मराठा बांधवांना आंदोलनात सहभागी केले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, आजारी असलो तरी ते मेळाव्यात सहभागी (Maratha Protest) होतील. अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून ते कार्यक्रम स्थळी पोहोचतील. त्यामुळे दसरा मेळाव्याची परंपरा मोडणार नाही.
मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
राज्यातील सध्या मराठा-ओबीसी संदर्भातील वातावरण संवेदनशील असून, या मेळाव्याकडे संपूर्ण (Maratha Reservation) राज्याचे लक्ष लागले आहे. उद्याच्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील काय घोषणा करणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्याचा दसरा मेळावा
यावेळी जरांगे पाटील यांचा मेळावा राज्यातील राजकीय व सामाजिक चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. त्यांच्या तब्येतीमुळे अनेक चाहते चिंतेत असले तरी त्यांनी उपस्थित राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ही परिस्थिती सामाजिक, राजकीय तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मोठे परिणाम घडवू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.