पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांना मोठी माहिती; मास्टरमाइंडचा थेट पाकिस्तानच्या…

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांना मोठी माहिती; मास्टरमाइंडचा थेट पाकिस्तानच्या…

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांना मोठी माहिती मिळाली आहे. दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसाचा पाकिस्तानी (Attack) सैन्याशी थेट संबंध आहे. गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, हाशिम मूसा दहशतवादी बनण्याआधी पाकिस्तानी सैन्यात पॅरा कमांडो होता.

भारताविरोधात गरळ ओकली

सूत्रांच्या माहितीनुसार, हाशिम मूसाचा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने मिळून मूसाने पहलगाम दहशतवादी हल्ला प्रत्यक्षात आणला. हाशिम मूसाला लश्कर-ए-तैयबाने प्रशिक्षण देऊन कश्मीरला पाठवलं होतं. मूसाने इथे येऊन तीन स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने संपूर्ण घटना प्रत्यक्षात आणली अशी माहिती सूत्रांनी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तीन दिवसआधी मुनीर यांनी एक भाषण केलं होतं. या भाषणात मुनीर यांनी भारताविरोधात गरळ ओकली होती. म्हणून पहलगाम हल्ल्यासाठी मुनीर यांना जबाबदार धरलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात चर्चा; पहलगाम घटनेवर मोठा निर्णय?

कोणाला संशय येऊ नये यासाठी हल्ल्याच्यावेळी मूसा आणि त्याच्या साथीदारांनी आर्मीचा ड्रेस परिधान केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी त्यांन पर्यटकांवर हल्ला केला. काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदा पर्यटकांवर इतका मोठा हल्ला झालाय. सूत्रांनी सांगितलं की, मूसाच ISI शी थेट कनेक्शन आहे. त्यांच्याच सांगण्यावरुन तो लश्कर ए तैयबामध्ये सहभागी झाला होता.

पत्रकाराचा सनसनाटी आरोप

मूसा याआधी सुद्धा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता. मूसाने कोवर्ट ऑपरेशन्समध्ये ट्रेनिंग केलय. मूसाचा खात्मा हा भारतीय सैन्याचा पहिला प्रयत्न आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार आदिल राजा यांनी मोठा दावा केला आहे. आदिल यांच्यानुसार मुनीर यांच्या सांगण्यावरुन हा हल्ला करण्यात आला. मुनीर यांना पाच वर्षांचा कार्यकाळ हवा आहे. म्हणून त्यांनी भारताविरोधात तणाव निर्माण केला आहे असं आदिल यांनी पोस्टमध्ये म्हटलय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube