Download App

श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी देणगीची मागणी : फसवणूक करणारे रॅकेट ‘विहिंप’कडून उघडकीस

Ram Mandir : अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाची वाट बघतोय. मात्र त्यापूर्वीच भक्तांकडून बांधकामासाठी देणग्या गोळा करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे एक रॅकेट उघडकीस आले आहे, यावर विश्व हिंदू परिषदेने (VHP) कारवाईची मागणी केली आहे. तसेच या फसवणुकीला बळी पडू नका असे आवाहनही सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना केले आहे. (Donation demand for construction of Ram temple: Fraud racket exposed by VHP)

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी X वर (पूर्वीचे ट्विटर) याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, “श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र अयोध्या, उत्तर प्रदेश” नावाचे बनावट सोशल मीडिया पेज तयार करण्यात आले आहे. क्यूआर कोड दिलेल्या या पेजवरुन युजर्सला राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी देण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र हे पेज खोटे असून याबाबत दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिस प्रमुखांकडे तक्रार करण्यात आली आहे. केंद्रीय हे गृहमंत्रालयाकडेही हे प्रकरण पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

अयोध्येतील एका विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यानेही फोनवर फसवणूक करणाऱ्याशी संभाषण केले. यावेळी राम मंदिराच्या नावाने देणगी मागणाऱ्या व्यक्तीने म्हटले की,”मी अयोध्येतून बोलत आहे. तुम्ही जमेल तितके योगदान द्या. तुमचे नाव आणि नंबर डायरीत नोंदवला जाईल. मंदिर पूर्ण झाल्यावर तुम्हा सर्वांना अयोध्येला बोलावले जाईल. तुम्हाला माहित आहे की मुस्लिम समुदाय आणि हिंदू समुदायामध्ये संघर्ष सुरू आहे. मुस्लिम समुदाय आपले मंदिर बांधू देत नाहीत, म्हणून आपण आपल्या मंदिरासाठी निधी उभारत आहोत ”

दरम्यान, हे रॅकेट समोर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेने व्हिडिओ संदेश जारी केला आहे. “श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने कोणालाही निधी गोळा करण्याचा अधिकार दिलेला नाही. लोकांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये यासाठी गृह मंत्रालय, उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचाकल आणि दिल्लीचे पोलिस आयुक्त यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. “हा आनंदाचा प्रसंग आहे, आम्ही आमंत्रणे पाठवत आहोत. आम्ही कोणतीही देणगी स्वीकारणार नाही,” असेही विनोद बन्सल यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

follow us