पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. मात्र, आता ‘झारा दासगुप्ता’ असं नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी कुरुलकरांनी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सची माहिती समोर येऊ लागली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. यात कुरुलकरांनी भारताच्या काही क्षेपणास्त्रांविषयी झाराशी चर्चा केल्याचं उघड झालं आहे. एटीएसनं पुणे कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तब्बल १८३७ पानांचं व्हॉट्सअॅप चॅट जोडलं आहे.
अतुल लोंढेंनी केसरकरांची इज्जतच काढली म्हणाले, देश कसा चालवायचा काँग्रेसला…
नेमके काय आहे प्रकरण?
पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे.प्रदीप कुरुलकर यांना ३ मे रोजी एटीएसनं अटक केली. पाकिस्तानी महिला गुप्तहेराच्या जाळ्यात अडकून देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती, तसेच काही क्षेपणास्त्रांची माहितीही दिल्याची बाब समोर आली आहे.
या महिला गुप्तहेरानं कुरुलकरांना तिचं नाव झारा दासगुप्ता असं सांगितलं होतं. या दोघांमधये १० जून २०२२ ते २४ फेब्रुवारी २०२३ या काळात असंख्य वेळा व्हॉट्सअॅप चॅट झाल्याची बाब त्यांच्या मोबाईलच्या तपासात उघड झाली आहे. कुरुलकरांना एटीएसनं ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्टअंतर्गत अटक केली आहे.
‘जायचं तर जा पण, पक्षाशी गद्दारी करू नका अन्यथा’.. उद्धव ठाकरेंचा फुटीरांना रोखठोक इशारा
चॅट्समध्ये काय होते?
त्या चॅट्समध्ये “ते सर्वात विद्ध्वंसक ब्रह्मोससुद्धा तूच बनवलं आहेस का बेब?” असा प्रश्न झारानं विचारला असता कुरुलकरांनी “माझ्याकडे ब्रह्मोसच्या सर्व प्रकारांचे १८६ पानांचे सुरुवातीचे रिपोर्ट्स आहेत. मी त्यांची कॉपी व्हॉट्सअॅपवर पाठवू शकत नाही कारण ते गोपनीय आहेत. पण मी ते ट्रेस करून तयार ठेवतो. तू इथे आलीस की मी ते तुला दाखवेन”, असं झाराला सांगितल्याचं चॅट्समध्ये दिसत आहे.
एटीएसनं सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, कुरुलकरांनी पाकिस्तानी महिला गुप्तहेराचा नंबर एका ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये तिनं सांगितलेल्या झारा दासगुप्ता या नावाने सेव्ह न करता ‘हॅप्पी मॉर्निंग’ या नावाने सेव्ह केला होता. त्यांनी झाराला डीआरडीओच्या दोन वैज्ञानिकांची नावंही कळवली होती.