केरळमधील (Kerala) कोझिकोड विमानतळावरून 44 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह (Drugs) एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा त्याला कोझिकोड विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. हा व्यक्ती उत्तर प्रदेशातील असून केनियातील (Kenya) नैरोबीहून (Nairobi) शारजामार्गे (Sharjah) केरळमधील कोझिकोड विमानतळावर पोहोचला होता.
डीआरआयच्या कालिकत प्रादेशिक युनिटने उत्तर प्रदेशातील रहिवासी राजीव कुमार याच्याकडून 3.5 किलो कोकेन आणि 1.3 किलो हेरॉईन जप्त केले. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 44 कोटी रुपये आहे.
India China Conflict : चीनच्या कुरापती सुरूच, आता नकाशात केला अरुणाचल प्रदेशचा समावेश, वाद पेटणार?
ते म्हणाले की DRI अधिकार्यांनी सोमवारी नैरोबी, केनियाहून शारजाहमार्गे एअर अरेबियाच्या फ्लाइटमधून येथे आलेल्या प्रवाशाला रोखले आणि तपासादरम्यान त्याच्याकडून 4.8 किलो अमली पदार्थ जप्त केले. आरोपीने शूज, पर्स, बॅग आणि फाइल फोल्डर यासारख्या वस्तूंमध्ये आम्ली पदार्थ लपवून ठेवले होते. संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.