Cowin Data Leak : ‘कोविन अ‍ॅप डेटा लीकच्या बातम्या…’ आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी म्हणतात…

Cowin Data Leak : कोविन अ‍ॅपमधील डेटा टेलिग्रामवर लीक झाला असून यामध्य देशभरातील अनेक राजकीय नेते, पत्रकारांचा समावेश आहे. कोरोना काळात देशभरात नागरिकांना कोरोना लस घेण बंधनकारक करण्यात आलं होतं. लसीकरणादरम्यान नागरिकांना कोविन अ‍ॅपवर माहिती देणं बंधनकारक होतं. आता लसीकरण केलेल्या नागरिकांची माहिती या अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. आता ही माहिती ऑनलाईन लीक झाल्याची […]

Co Win

Co Win

Cowin Data Leak : कोविन अ‍ॅपमधील डेटा टेलिग्रामवर लीक झाला असून यामध्य देशभरातील अनेक राजकीय नेते, पत्रकारांचा समावेश आहे. कोरोना काळात देशभरात नागरिकांना कोरोना लस घेण बंधनकारक करण्यात आलं होतं. लसीकरणादरम्यान नागरिकांना कोविन अ‍ॅपवर माहिती देणं बंधनकारक होतं. आता लसीकरण केलेल्या नागरिकांची माहिती या अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. आता ही माहिती ऑनलाईन लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर आता केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. तर काही अधिकाऱ्यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली आहे. ( Health Ministry Officers Explain on Cowin Data Leak issue)

आरोग्य मंत्रालयाने कोविन अ‍ॅपमधील डेटा लीक झाल्याचे आरोप फेटाळले आहेत. कोविन अ‍ॅपमधील डेटा लीकच्या बातम्या बिनबुडाच्या आहेत. तसेच कोविन अ‍ॅप पुर्ण सुरक्षित आहे. असं त्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, आरोग्य मंत्रालयाने कोरोना लसीच्या नोंदणीसाठी तयार केलेले कोविन अ‍ॅप डेटा सुरक्षेच्या दृष्टीने पुर्णपणे आहे. डेटा लीकचा अहवाल चुकीचा असून त्याला कोणताही आधार नाही.

मोदी सरकारचा Covid डेटा लीक; सुप्रिया सुळेंनी जाब विचारत मागितलं स्पष्टीकरण…

त्याचबरोबर आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात CERT-In कोविन अ‍ॅपमधील डेटा लीक प्रकरणावर अहवाल मागवला आहे. तर काही अधिकाऱ्यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, कोविड-19 लसीकरणाच्या नोंदणीवेळी कोविन पोर्टल नागरिकांची जन्म तारिख, पत्ता ही माहिती मागवत होते. ती तो अ‍ॅप एकत्र करत नाही. तसेच ही माहिती केवळ नागरिकांनी कोरोना लसीचा फर्स्ट डोज, सेकेंड डोज किंवा बूस्टर डोज घेतला आहे की, नाही हे तापासते.

CoWIN पोर्टलवरून डेटा लीक? विरोधी पक्षनेत्यांच्या दाव्यावर सरकारने दिले स्पष्टीकरण

कोविन अ‍ॅपवरील नागरिकांची माहिती लिक झाल्याचं समजताच देशभरातून विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून मजबूत सुरक्षा असल्याचा दावा केला जात असतानाच नागरिकांची गोपनीय माहिती लिक कशी झाली? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान या अगोदर देखील कोविन अ‍ॅप हॅक झालं होत. त्यावेळी जवळपास 15 कोटी लोकांची माहिती लीक झाली होती.

Exit mobile version