मोदी सरकारचा Covid डेटा लीक; सुप्रिया सुळेंनी जाब विचारत मागितलं स्पष्टीकरण…

मोदी सरकारचा Covid डेटा लीक; सुप्रिया सुळेंनी जाब विचारत मागितलं स्पष्टीकरण…

Covid Data : मोदी सरकारचा कोविन अॅपचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर येताच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला जाब विचारत चांगलच धारेवर धरलं आहेत. दरम्यान, कोविन अॅपचा डेटा प्रकरणावर केंद्र सरकारला स्पष्टीकरण देणं बंधनकारक असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात सुळेंनी ट्विटही केलं आहे.

कोविन अॅपमधील डेटा टेलिग्रामवर लीक झाला असून यामध्य देशभरातील अनेक राजकीय नेते, पत्रकारांचा समावेश आहे. कोरोना काळात देशभरात नागरिकांना कोरोना लस घेण बंधनकारक करण्यात आलं होतं. लसीकरणादरम्यान नागरिकांना कोविन अॅपवर माहिती देणं बंधनकारक होतं. आता लसीकरण केलेल्या नागरिकांची माहिती या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. आता ही माहिती ऑनलाईन लीक झाल्याची माहिती समोर आलीय.

खासदार सुळे ट्विटमध्ये म्हणाल्या, कोरोना लसीकरणासाठी कोविन अॅपवरील नागरिकांची माहिती टेलिग्रामवर उघडकीस आली आहे. हा प्रकार नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकारांचं उल्लंघन करीत असल्याच सुळेंनी म्हटलंय.

IAS Anil Ramod : लाचखोर अधिकाऱ्याची पत्नीही कंपन्यांची मालकीण; धक्कादायक माहिती उजेडात

तसेच केंद्र सरकारने नागरिकांची गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी डेटा संरक्षण कायदे करुन अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणीही खासदार सुळे यांनी केलीय. नागरिकांचा डेटा लीक झाल्याची माहिती खरी असेल तर हा प्रकार गंभीर आहे. यावर सरकारने तत्काळ स्पष्टीकरण देण गरजेचं असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

कोविन अॅपवरील नागरिकांची माहिती लिक झाल्याचं समजताच देशभरातून विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून मजबूत सुरक्षा असल्याचा दावा केला जात असतानाच नागरिकांची गोपनीय माहिती लिक कशी झाली? असा सवाल उपस्थित होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube