IAS Anil Ramod : लाचखोर अधिकाऱ्याची पत्नीही कंपन्यांची मालकीण; धक्कादायक माहिती उजेडात

IAS Anil Ramod : लाचखोर अधिकाऱ्याची पत्नीही कंपन्यांची मालकीण; धक्कादायक माहिती उजेडात

IAS Anil Ramod : पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड (Anil Ramod) सीबीआयच्या तडाख्यात सापडले आहेत. सीबीआयने त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयात टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यावाधींचे घबाड हाती लागले आहे. या प्रकरणात त्यांची सखोल चौकशी केली असून आणखी एक धक्कादायक माहिती हाती आली आहे. मेसर्स वेदलक्ष्मी डेव्हलपर्स अँड डिझायनर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याचे तपासातून उघड झाले आहे.

सीबीआयने शुक्रवारी पुण्यात धाड टाकली होती. यावेळी अनिल रामोड यांना 8 लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर या प्रकरणात सीबीआयने आणखी सखोल तपास सुरू केला. या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. रामोड यांच्या पुण्यातील कार्यालये आणि निवासस्थानी सीबीआयचे पथक धडकले. जवळपास 6 कोटी 64 लाख रुपये रक्कम आढळून आली. काही दागिने आणि कागदपत्रेही जप्त करण्यात आली.

IAS Anil Ramod: पुण्यातील अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचे ‘घबाड’ ! पैसे मोजताना सीबीआय अधिकाऱ्यांची दमछाक

त्यानंतर सीबीआय पथक त्यांच्या गावीही गेले. या ठिकाणच्या तपासात सुद्धा सीबीआयला काही महत्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. यामध्ये त्यांच्या पत्नीच्या नावे मोठ्या कंपन्या असल्याचे दिसून आले आहे. लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडल्याने हा घोटाळा समोर आला आहे. महत्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम सीबीआयच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहेत.

दरम्यान, या प्रकरणात रामोड यांच्या घरी आणि कार्यालयात तपास केला जात आहे. चौकशी सुरू आहे. त्यामुळे आणखी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube