Download App

Earthquake : अंदमानात जमीन हादरली! जोरदार भूकंपाचे झटके, नागरिकांत पसरली घबराट

Andaman and Nicobar Islands Earthquake : अंदमान आणि निकोबार बेटांवर शनिवारी सकाळी जोरदार भूकंपाचे झटके बसले. पोर्ट ब्लेअर शहरापासून 126 किलोमीटर आग्नेय भागात हा भूकंप झाला. 5.8 रिश्टर स्केल अशी भुकंपाची तीव्रता मोजण्यात आली. शनिवारी सकाळी 12.53 वाजता हा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भुकंपाची खोली 69 किलोमीटर होती. 107.5 अक्षांश आणि 93.47 रेखांशावर हा भूकंप झाला. याआधी मागील आठवड्यात राजस्थान राज्याची राजधानी जयपूर शहरात एकापाठोपाठ एक भूकंपांचे धक्के बसले होते.

या भुकंपात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक प्रशासन घडामोडींवर नजर ठेऊन आहे. आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जात आहेत.

दरम्यान, याआधी मागच्या आठवड्यात राजस्थानची राजधानी जयपूर शहरात शक्तीशाली भुकंपाचे झटके जाणवले होते. हा भूकंप इतका जोरदार होता की लोकांना स्फोट झाल्यासारखा आवाज ऐकू आला. फक्त 16 मिनिटांच्या कालावधीत तीन वेळेस भुकंपाचे धक्के बसले. राजस्थानमधील काही शहरांत मागील काही दिवसांपासून कंपन जाणवत आहे. याआधी 24 जानेवारी आणि 21 मार्च रोजी भूकंपाचे जोरदार झटके बसले होते. यावेळी लोक घाबरून घराबाहेर आले होते. सीकर जिल्ह्यात झालेला भूकंप तर शक्तीशाली होता.

 

Tags

follow us