Download App

मणिपूरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • Written By: Last Updated:

Manipur earthquake : ईशान्येकडील मणिपूर राज्यातील शिरूई येथे आज सायंकाळी 7.31 वाजता 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू शिरूईपासून 3 किमी वायव्येस 31 किमी खोलीवर होता. गेल्या महिन्यात 16 एप्रिल रोजीही राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी 7.31 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी लोक घराबाहेर पडून मोकळ्या ठिकाणी गेले. मात्र, भूकंपाची तीव्रता कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. डोंगराळ ईशान्येकडील राज्यांमध्ये, विशेषत: आसाम, मिझोराम आणि मणिपूरमध्ये लागोपाठ झालेल्या भूकंपांनी अधिकाऱ्यांची चिंता वाढवली आहे. भूकंपशास्त्रज्ञ ईशान्य भारतीय क्षेत्राला जगातील सहाव्या क्रमांकाचा भूकंप प्रवण प्रदेश मानतात.

16 एप्रिलला देखील भूकंपाचे धक्के
16 एप्रिलला भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजण्यात आली होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने सांगितले की, सकाळी दक्षिण मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यात आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप पृष्ठभागापासून 10 किमी खोलीवर झाला. मात्र, या काळात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Tags

follow us