Download App

Earthquake : गुजरात-हरियाणात जोरदार भूकंप; लोक घाबरून पळाले

Earthquake : मागील काही दिवसांपासून भूकंपाचे (Earthquake) प्रमाण वाढले आहे. दक्षिण आशियातील अनेक देशात मागील काही दिवसांत शक्तीशाली भूकंप झाले आहेत. आता भारतातील कच्छ मध्ये जोरदार भूकंप झाला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 इतकी मोजण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नाही.

एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, कच्छमधील दुधई परिसरात रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू दुधईपासून 15 किलोमीटर दूर होता. भूकंपाचे धक्के बसू लागताच लोक भीतीने घराबाहेर आले. यानंतर गुरूवारी रात्री 12.18 वाजण्याच्या सुमारासही 3.2 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपातही काही नुकसान झाले नाही.

Earthquake : इंडोनेशियात जमीन हादरली! भूकंपाच्या धक्क्याने लोक घराबाहेर पळाले

दुसरीकडे हरियाणा राज्यातील झज्जर येथे शुक्रवारी दुपारी भूकंप (Earthquake) झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, 3.3 इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता. तर कच्छमध्ये 4.5 इतकी तीव्रता होती. झज्जरमध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत आठ किलोमीटरवर होता.

याआधी मागील आठवड्यात छत्तीसगड राज्यात काही ठिकाणी भूकंप (Earthquake) झाला. हा भूकंप सौम्य होता. या घटनेत अद्याप काही नुकसान झालेले नाही. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरगुजा जिल्ह्याचे मुख्यालय अशलेल्या अंबिकापूर शहराजवळ सायंकाळी उशीरा दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले. पहिला धक्का 8.40 वाजता तर दुसरा धक्का थोड्यावेळाने रात्री 8.56 वाजता जाणवला. याची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली. त्याचा केंद्रबिंदू अंबिकापूर शहरापासून दहा किलोमीटर पूर्वेस सुमारे 11 किलोमीटर खोलीवर होता.

Tags

follow us