Download App

Bibek Debroy : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचं निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून देबरॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी डॉ.

  • Written By: Last Updated:

Economist Bibek Debroy Passed Away : अर्थतज्ञ आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे (Bibek Debroy) अध्यक्ष बिबेक देबरॉय यांचं वयाच्या 69 व्या वर्षी निधन झालं. भारतीय अर्थव्यवस्थेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी ओळखले जाणारे, देबरॉय यांनी देशाची आर्थिक धोरणे तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून देबरॉय यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी डॉ. देबरॉय यांना अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचे अंतरंग आणि शैक्षणिक चर्चेची त्यांची आवड मला नेहमी लक्षात राहील. त्यांच्या निधनाने दु:ख झालं. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना.

देबरॉय यांच्या जाण्याने देश एका ज्ञानी माणसाला मुकला, असं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ‘देशातल्या कीर्तीवंत अर्थतज्ज्ञांपैकी ते एक होते. त्यांचं लिखाण सर्वसमावेशक आणि अभ्यासपूर्ण असे. ध्येयधोरणं ठरवताना त्यांचा व्यासंग नेहमीच मार्गदर्शक ठरत असे. देशाच्या विकास प्रक्रियेत त्यांचं मोलाचं योगदान होतं. वर्तमानपत्रांमधील त्यांचं लिखाण वाचकांना समृद्ध करत असे. अर्थविश्वाला त्यांची उणीव नेहमीच भासेल’, अशा शब्दांत प्रधान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Pawar Vs Pawar : राजकीय फुटीनंतर आता कुटुंबातही फूट, यंदा पवार कुटुंबाचा वेगवेगळा पाडवा

१९५५ साली जन्मलेल्या देबरॉय यांनी कोलकाता शहरातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर राजधानी दिल्लीतल्या दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून तसंच ट्रिनिटी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.

जागतिकीकरणानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत धोरणं ठरवताना देबरॉय यांचा सिंहाचा वाटा होता. नीती आयोगाचे सदस्य राहिलेल्या देबरॉय यांनी रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या सूचना अंमलात आणल्यामुळेच भारतीय रेल्वे हा उपक्रम हा जगातल्या सर्वोत्तम अशा सार्वजनिक वाहतूक उपक्रमांपैकी एक होऊ शकला.

देशाच्या शाश्वत विकासाला हातभार लागेल या दृष्टिकोनातून विदाकेंद्रित धोरणं आखण्यात त्यांचा हातखंडा होता. देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक साक्षरतेचं महत्त्व कळावं यासाठीही त्यांनी सातत्याने काम केलं.

follow us

संबंधित बातम्या