वादाची ठिणगी पडलीच! नेपाळच्या नव्या नोटांवर तीन भारतीय क्षेत्र; चीनी कंपनीला छपाईचं कंत्राट

वादाची ठिणगी पडलीच! नेपाळच्या नव्या नोटांवर तीन भारतीय क्षेत्र; चीनी कंपनीला छपाईचं कंत्राट

Chinese Firm to Print Nepal Notes : नेपाळमध्ये सत्तांतर होऊन चीनचे समर्थक सत्तेत आले आहेत. त्यानंतर आता पुन्हा (Nepal News) भारताला त्रास देण्याचे उद्योग नेपाळ सरकारने सुरू केले आहेत. नेपाळ राष्ट्र बँकेने देशाच्या मानचित्र असलेल्या शंभर रुपयांच्या नोटा छापण्याचे कंत्राट एका चीनी कंपनीला दिले आहे. नेपाळ सरकारच्या मंत्रिमंडळाने शंभर रुपयांच्या नोटेच्या डिझाईन बदलास मंजुरी दिली आहे. यामध्ये रणनितीक दृष्ट्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी या तीन क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नेपाळ आणि भारतात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या भागांवरून दोन्ही देशांत मागील ३५ वर्षांपासून वाद सुरू आहेत.

नेपाळच्या या नव्या राजकीय नकाशाला १८ जून २०२० रोज नेपाळच्या संविधानात संशोधन करुन मान्यता देण्यात आली होती. यामध्ये कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुरा या भागांना नेपाळचे प्रदेश म्हणून दाखवण्यात आले आहे. भारताने या प्रकारांवर आक्षेप घेतला आहे. तरी देखील नेपाळने याची काहीच दखल घेतलेली नाही.

नेपाळमध्ये वादळी पाऊस! आत्तापर्यंत 112 जणांचा मृत्यू; अनेकजण बेपत्ता, बिहारला पुराचा धोका

भारताने स्पष्ट केले आहे की पश्चिम नेपाळच्या सीमेवरील लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा भारताचे भाग आहेत. इंग्रजी वृत्तपत्र रिपब्लिका नुसार या नव्या नोटा छापण्याचे कंत्राट चायना बँकनोट प्रींटिंग अँड मीटींग कॉर्पोरेशन या कंपनीला देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बँकेने या चीनी कंपनीकडून शंभर रुपयाच्या जवळपास ३० कोटी नोटांची डिझायनिंग, छपाई, पुरवठा आणि वितरण करण्यास सांगितले आहे. या नोटांच्या छपाईसाठी जवळपास ८९.९ लाख डॉलर्स इतका खर्च येणार आहे. नेपाळ राष्ट्र बँकेचे प्रवक्त्यांची प्रतिक्रिया काय होती हे अद्याप समजलेले नाही.

दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली लवकरच चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे, चीनने कोणतेच आमंत्रण दिले नसतानाही ओली चीनला जाणार आहेत. नेपाळच्या पंतप्रधान कार्यालयातील उच्चस्तरीय सूत्रांच्या हवाल्याने माय रिपब्लिका वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. नेपाळ सरकारचे शंभर दिवस पूर्ण होण्याआधी प्रधानमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान ओली यांचा चीन दौरा प्रस्तावित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्र सरकारकडून मदत जाहीर; नेपाळ अपघातातील मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाख

follow us
  • fb
  • instagram
  • youtube