केंद्र सरकारकडून मदत जाहीर; नेपाळ अपघातातील मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाख

केंद्र सरकारकडून मदत जाहीर; नेपाळ अपघातातील मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाख

Nepal Bus Accident: नेपाळ बस अपघातातील (Nepal Bus Accident) प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील अंबुखैरेनी येथे शुक्रवारी झालेल्या या अपघातात महाराष्ट्रातील 25 जणांचा मृत्यू झाला होता तर 16 जण जखमी झाले होते. हे सर्वजण महाराष्ट्रातील 110 यात्रेकरूंच्या ग्रुपचा भाग होते आणि तीन बसमधून पोखरा ते काठमांडू प्रवास करत होते. अद्याप या भीषण अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.

या अपघातात मृत्यू झालेल्या 27 यात्रेकरूंचे मृतदेह शनिवारी भारतात दाखल झाले आहे. भारतीय हवाई दलाचे विशेष विमानाने 25 मृतदेह जळगाव येथे पोहोचले आहे तर बस चालक आणि सहाय्यकाचे मृतदेह रस्त्याने भारत-नेपाळ सीमेजवळ असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे पाठवण्यात आले आणि त्यातून तेथून त्यांना गोरखपूरला नेण्यात येणार आहे.

माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील रणगाव, पिंपळगाव, तळवेल या गावातील सर्व भाविक होते. माहितीनुसार, 16 ते 28 ऑगस्टपर्यंत असा यांचा प्रवास होतो मात्र तनहुन जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत त्यांची बस कोसळली. तर दुसरीकडे माहितीनुसार, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे आज सकाळी विमानाने काठमांडूला पोहोचले होते. तिथे त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेतली.

तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी या अपघातातील प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप? अभिनेत्री मालदीवमध्ये दिसली रुमेड बॉयफ्रेंडसोबत

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे तर परराष्ट्र मंत्रालयाने रस्ते अपघातात नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि नेपाळमधील भारतीय दूतावास सर्वतोपरी मदत करत असल्याचे सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube