Download App

Land For Job Scam : लालू प्रसाद यादवांचा निकटवर्तीय अमित कात्यालला अटक, ईडीची मोठी कारवाई

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली: ‘लँड फॉर जॉब स्कॅम’ प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) एके इन्फोसिस्टमचे प्रवर्तक उद्योगपती अमित कात्याल (Amit Katyal) यांना अटक केली आहे. कात्याल हे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे निकटवर्तीय आहेत.

Babar Azam टीकाकारांवर भडकला! सेमीफायनलबद्दल बाबर प्रचंड आशावादी 

जमीन घोटाळ्याप्रकरणी कात्याल आणि एके इन्फोसिस्टमची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. लँड फॉर जॉब स्कॅम प्रकरणात एकूण मिळकत 600 कोटी रुपये असल्याचा आरोप ईडीने केला होता.

लालू यादव यांच्या एनएफसी निवासस्थानातून एके इन्फोसिस्टमचे कार्यालय सुरू आहे. ईडीने मार्चमध्ये एका निवेदनात म्हटले होते की, मालमत्ता मेसर्स एबी एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स एके इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कार्यालय म्हणून कागदावर घोषित केली गेली आहे, परंतु ती केवळ तेजस्वी यादव यांच्याद्वारे निवासी संकुल म्हणून वापरली जात आहे.

Mr And Mrs Mahi: जान्हवी अन् राजकुमारच्या ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ ची रिलीज डेट ढकलली पुढे 

कात्यालचे 2 महिन्यांपासून समन्सकडे दुर्लक्ष
सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय तपास यंत्रणेने कात्यालला शुक्रवारी ताब्यात घेतले आणि चौकशीनंतर त्याला अटक केली. त दरम्यान, आता कात्यालला स्थानिक न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर ईडी चौकशीसाठी त्याची कोठडी मागणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्याल सुमारे दोन महिन्यांपासून ईडीच्या समन्सकडे दुर्लक्ष करत होते. दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच या प्रकरणी त्याच्याविरुद्ध जारी केलेले ईडीचे समन्स रद्द करण्याची विनंती करणारी त्यांची याचिका फेटाळली होती.

एके इन्फोसिस्टम्स प्रकरणात एक ‘लाभार्थी कंपनी’

ईडीने या वर्षी मार्चमध्ये लालू, तेजस्वी, त्यांच्या बहिणी आणि इतरांच्या घरावर छापे टाकले तेव्हा कात्यालशी संबंधित घरांचीही झडती घेतली होती. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, कात्याल हा आरजेडी सुप्रिमोचा जवळचा सहकारी तसेच एके इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडचा माजी संचालक आहे. एके इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड ही या प्रकरणात कथितपणे लाभार्थी कंपनी आहे आणि तिचा नोंदणीकृत पत्ता दक्षिण दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमधील निवासी इमारत आहे, ज्याचा वापर तेजस्वी यादव करत होते.

लालू रेल्वेमंत्री असताना घोटाळा 

कथित घोटाळा लालू केंद्रातील पहिल्या संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये रेल्वेमंत्री असतानाचा आहे. असा आरोप आहे की 2004 ते 2009 पर्यंत भारतीय रेल्वेच्या विविध सेक्टरमध्ये ग्रुप ‘डी’ पदांवर अनेक लोकांची नियुक्ती करण्यात आली आणि त्या बदल्यात या लोकांनी आपली जमीन तत्कालीन रेल्वे मंत्री लालू यांच्या कुटुंबीयांना आणि एके इन्फोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेड यांना हस्तांतरित केली होती.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, नियुक्तीसाठी कोणतीही जाहिरात किंवा सार्वजनिक सूचना जारी करण्यात आली नव्हती, परंतु पाटणामधील काही रहिवाशांना मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूरमधील विविध विभागीय रेल्वेमध्ये अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या नोकरीच्या बदल्यात उमेदवारांनी थेट किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमार्फत लालूंच्या कुटुंबातील सदस्यांना प्रचलित बाजारभावाच्या एक चतुर्थांश ते एक पंचमांश इतक्या सवलतीच्या दरात जमिनी विकल्याचा आरोप तपास संस्थेने केला आहे.

दरम्यान, आता अमित कात्यालच्या अटकनेनंतर लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज