लालू प्रसाद यादव ते जयललिता या दिग्गज नेत्यांना गमवावी लागली होती, आमदारकी व खासदारकी

जयललिता तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांना दोनदा आमदारकी गमवावी लागली होती. 2002 मध्ये त्यांना पहिल्यांदा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.

कुलदीप सिंग सेंगर उन्नावचे भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याला तीन वर्षांपूर्वी एका बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. शिक्षा होताच तो अपात्र ठरला होता.

लालू प्रसाद यादव माजी केंद्रीय मंत्री आणि बिहारचे मुख्यमंत्री लालू यादव यांना 2013 मध्ये चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. यानंतर त्यांची खासदारकी गेली होती.
