Download App

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, 750 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त

National Herald : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Soniya Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांंना ईडीने मोठा धक्का दिला आहे. नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणात ईडीने (ED) मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली एजेएल आणि यंग इंडियन यांची 751.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे देखील शेअर्स आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणेने सांगितले की, जप्त केलेल्या मालमत्तेपैकी एजेएलची दिल्ली, मुंबई आणि लखनऊसह अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. त्याची एकूण किंमत 661.69 कोटी रुपये आहे. ईडीने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले आहे. यात म्हटले की वृत्तपत्र प्रकाशक असोसिएटेड जर्नल लिमिटेड (एजेएल) आणि त्याची होल्डिंग कंपनी यंग इंडियन यांच्या विरोधात (पीएमएलए) आदेश जारी करण्यात आला आहे.

ललित पाटील प्रकरणात आता येरवड्याचे अधिकारीही अडचणीत ! एकमेंकावर पत्रातून ‘ब्लेम गेम’

निवेदनात म्हटले आहे की, “एजेएलकडे दिल्ली, मुंबई आणि लखनऊ सारख्या देशातील अनेक शहरांमध्ये असलेल्या स्थावर मालमत्तेच्या रूपात गुन्ह्यांचे पैसे असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांची किंमत 661.69 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, यंग इंडियनकडे एजेएलच्या ‘इक्विटी शेअर्स’च्या रूपात गुन्ह्यातील 90.21 कोटी रुपये आहेत.

काँग्रेसचा हल्लाबोल
ईडीच्या या कारवाईवर काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंधवी म्हणाले, “ईडीच्या एजेएल मालमत्ता जप्त केल्याच्या बातम्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकांतील पराभवावरून लक्ष हटवण्याची त्यांची हतबलता दर्शविते.” ते पुढे म्हणाले की, भाजप आघाडीचे मित्रपक्ष सीबीआय, ईडी किंवा आयटी त्यांचा (भाजप) निवडणुकीत पराभव रोखू शकत नाहीत.

‘रिलायन्स पश्चिम बंगालमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार’; मुकेश अंबानींची घोषणा

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष दररोज केंद्रातील मोदी सरकारवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करतात. हे आरोप फेटाळून लावत भाजपचे म्हणणे आहे की एजन्सी पुराव्याच्या आधारे तपास करत आहेत.

ईडीने या प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. राजस्थान आणि तेलंगणामध्ये निवडणुका होणार आहेत. पाचही राज्यांतील निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत.

Tags

follow us