ललित पाटील प्रकरणात आता येरवड्याचे अधिकारीही अडचणीत ! एकमेंकावर ‘ब्लेम गेम’

  • Written By: Published:
ललित पाटील प्रकरणात आता येरवड्याचे अधिकारीही अडचणीत ! एकमेंकावर ‘ब्लेम गेम’

पुणेः ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरण हे ससूनचे अधिष्ठाता, दोन पोलिस कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. आता तर येरवडा कारागृह, ससून, पोलीस असे तिन्ही विभागात संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्यातून या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. येरवडा कारागृह अधिक्षकांनी ससून रुग्णालयाला (Sasoon Hospital) ललित पाटील प्रकरणी लिहिलेले एक पत्र समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

‘रिलायन्स पश्चिम बंगालमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार’; मुकेश अंबानींची घोषणा

ललित पाटील याला ने-आण करण्यासाठी एस्कॉर्ट नसल्याचे कारण सांगत येरवडा कारागृहाने ललित पाटीलचा मुक्काम ससूनमध्येच राहण्यासाठी पत्र पाठवल्याचे उघडकीस आले आहे. येरवडा कारागृहाने जून 2023 ला पत्र लिहिल्यानंतर सलग चार महिने ललित पाटीलचा मुक्काम ससून रुग्णालयातच केला आहे. ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात रुग्णालय प्रशासन दोषी असल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केल्याच्या आरोपावरून दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

LetsUpp Special : नगर, नाशिकविरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष काय? तोडगा कसा निघेल ?

मात्र आता कारागृह अधिक्षकांनी ललित पाटीलला येरवडा कारागृहात पाठवू नका, अशा प्रकाराचे पत्र लिहिले आहे. यावर आता कारागृह प्रशासनानकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कैदी कारागृहातून रुग्णालयात गेल्यानंतर सर्व जबाबदारी पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाची असते, कारागृह प्रशासनाचा संबंध नसल्याचं येरवडा कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ यांनी म्हटले आहे.


ससूनला पाच वेळा विनंती पत्र; कारागृह अधीक्षकांचा खुलासा

येरवडा कारागृह प्रशासनावर संशय व्यक्त होऊ लागल्यानंतर कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.कारागृह नियमामध्ये कैद्याला कारागृहात उपचार देऊ शकत नाही. कारागृहाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी हे कैद्याला ससूनला रेफर करतात. ससूनला रेफर झाल्यानंतर तो बंदी कारागृहात दाखल करेपर्यंत कारागृह प्रशासनाने काय करावे, अशी कारागृह नियमावलीमध्ये तरतूद नाही. न्यायालयाकडून कारागृहाकडून कैद्याच्या आरोग्याचा प्रगती अहवाल मागितला जातो. ललित पाटील या कैद्यावर काय उपचार सुरू आहेत. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला कारागृहात वर्ग करावे, असे पाचवेळा विनंती पत्र ससून वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांना लिहिण्यात आले. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये या संदर्भात प्रगती अहवाल सादर करण्यात आल्याचे धुमाळ यांनी म्हटले आहे. ससून रुग्णालयात कैदी अॅडमीट केल्यानंतर त्याच्यावर कसे आणि काय उपचार करायचा हा ससूनचा प्रश्न असल्याचा सवालही धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube