Chandrasekhar on Ramcharitmanas : काही दिवसांपूर्वी बिहारचे शिक्षणमंत्री आणि आरजेडी नेते डॉ.चंद्रशेखर (RJD leader Dr. Chandrasekhar) यांनी मनुस्मृती आणि रामचरितमानस (Ramcharitmanas) ही दोन्ही ग्रंथे पुस्तके समाजात द्वेष पसरवणारी पुस्तके आहेत, असा वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. आताही त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी रामचरितमानस या धार्मिक ग्रंथाची पोटॅशियम सायनाइडशी तुलना केली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, रामचरितमानसमध्ये नमूद केलेल्या काही गोष्टी पोटॅशियम सायनाइडसारख्या आहेत. पोटॅशियम सायनाईड जोपर्यंत त्यात राहील तोपर्यंत विरोध करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ‘पूजही विप्र सकल गुण हीना, शूद्र न पुजु वेद प्रवीणा’ या श्लोकाचा उल्लेख करून त्यांनी टीका केली आहे. यापूर्वीही शिक्षणमंत्र्यांनी रामचरितमानसबाबत आक्षेपार्ह विधान केले होते.
चंद्रशेखर म्हणाले, हे केवळ माझे मत नाही, तर महान हिंदी लेखक नागार्जुन आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांनीही रामचरितमानसमध्ये अनेक प्रतिगामी विचार असल्याचे म्हटले आहे.
‘विशिष्ट परिस्थितीत’ पतीने दुसऱ्या महिलेसोबत राहणे गुन्हा नाही : हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
ते म्हणाले, शास्त्रात अनेक महान गोष्टी आहेत, परंतु पोटॅशियम सायनाइड शिंपडल्यानंतर मेजवानीत 55 डिशेस दिल्या तर अन्न खाण्यास अयोग्य होते, असंही चंद्रशेकर म्हणाले. त्यांच्या या विधानामुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
भाजपची टीका-
भाजपचे प्रवक्ते राकेश कुमार सिंह म्हणाले की, शिक्षणमंत्र्यांना रामचरितमानसमध्ये पोटॅशियम सायनाईड दिसत असले तरी प्रत्यक्षात राजदसारखा पक्ष बिहारच्या राजकारणासाठी पोटॅशियम सायनाइड आहे. बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांनी श्री रामचरितमानसचे वर्णन पोटॅशियम सायनाइड असं केलं. तुम्ही या मंत्र्यावर बहिष्कार घालणार की नाही? त्या राजकीय पक्षावर आणि त्या नेत्यावर बहिष्कार टाकण्याची हिंमत आहे का? असा सवाल भाजप नेते संबित पात्रा यांनी केला.