‘विशिष्ट परिस्थितीत’ पतीने दुसऱ्या महिलेसोबत राहणे गुन्हा नाही : हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

‘विशिष्ट परिस्थितीत’ पतीने दुसऱ्या महिलेसोबत राहणे गुन्हा नाही : हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

दिल्ली : वैवाहिक आयुष्यातील ताण-तणावामुळे पत्नी किंवा पतीने घटस्फोट न घेता दुसऱ्या जोडीदारासोबत राहणे नैतिकदृष्ट्या योग्य मानले जात नाही. तर भारतीय दंड संहितेच्या कलम 494 अन्वये, हिंदू विवाह कायद्यानुसार कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाने त्यांचा पती/पत्नी जिवंत असताना आणि घटस्फोट झाला नसल्यास दुसरे लग्न करणे हा गुन्हा आहे. मात्र अशाच एका प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने पतीच्या बाजूने निकाल देत त्याचे दुसऱ्या व्यक्तीसोबत राहणे योग्य ठरविले आहे, तर पत्नीला फटकारले आहे. न्यायालयाने मानवी पैलू लक्षात घेऊन निर्णय दिला आहे. (husband to live with another woman in ‘certain circumstances’ It is not a crime High Court’s historic decision)

काय प्रकरण आहे?

पती दुसऱ्या महिलेसोबत राहत असल्याचा आरोप करत एका महिलेने पतीविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला. महिलेचे 2003 मध्ये लग्न झाले होते पण दोघे 2005 मध्ये वेगळे राहू लागले. या जोडप्याला दोन मुले आहेत. पत्नीच्या आरोपांनुसार, त्यांच्या कुटुंबाने त्यांचे लग्न मोठ्या थाटात आयोजित केले होते. असे असतानाही पतीने घरच्यांकडून अनेक मागण्या केल्या. मुलगा होईल, असे आश्वासन देऊन सासूने तिला काही औषधे दिली होती, मात्र तिचा गर्भपात करण्याचा त्यांचा उद्देश होता, असेही तिने आरोपात म्हटले आहे. त्याचवेळी पतीने आरोप केला की पत्नी आपल्याशी क्रूरपणे वागली, तिचा भाऊ आणि नातेवाईकांनी आपल्याला मारहाण केली.

विशेष अधिवेशनात येणार ‘निवडणूक आयुक्त’ विधेयक; मंजुरीनंतर ‘आयोगात’ होणार मोठा बदल

न्यायालयाने असा निर्णय का दिला?

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हे दोघेही अनेक वर्षांपासून वेगळे राहत असल्याचे वास्तव समोर आले. यादरम्यान पती दुसऱ्या महिलेसोबत राहू लागला. अशा परिस्थितीत जर एखादे जोडपे दीर्घकाळ एकमेकांसोबत राहत असेल तर ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नसते. अशा परिस्थितीत जर पती दुसर्‍या स्त्रीसोबत शांतपणे व सुखात राहू लागला तर त्याला क्रूरता म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. शिवाय हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचा दावा पत्नीने केला असला तरी ती आपला दावा सिद्ध करू शकली नाही आणि हे क्रूरतेचे कृत्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

भारतीयांनी इनरवेअर घालणं बंद केलं? रुपा ते जॉकीपर्यंत बड्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी घसरण

घटस्फोट याचिका प्रलंबित असताना प्रतिवादी-पतीने दुसर्‍या महिलेसोबत राहण्यास सुरुवात केली आहे, त्यांना दोन मुले आहेत हे जरी मान्य केले असले तरी, विशिष्ट परिस्थितीत या प्रकाराला क्रूरता म्हणता येणार नाही. जेव्हा पक्षकार 2005 पासून एकत्र राहत नाही आणि इतक्या वर्षांच्या विभक्ततेनंतर पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाही. तेव्हा पती दुसर्‍या स्त्रीसोबत राहून शांतता आणि सुख मिळवतो, याला क्रूरता म्हणता येणार नाही, असे म्हणत हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 13(1)(IA) अंतर्गत क्रूरतेच्या आधारावर पतीला घटस्फोट देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी महिलेची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube