राष्ट्रपती भवनात मोठा निर्णय! एडविन लुटियन्स यांचा पुतळा हटवला

या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर उपस्थित होते.

Edvin

Edvin

राष्ट्रपती भवनाच्या मध्यवर्ती प्रांगणात गेल्या अनेक दशकांपासून (Modi) एक कांस्य पुतळा उभा होता, ज्याला आतापर्यंत लाखो लोकांनी भेट दिली आहे. रविवारी (ता. २२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो पुतळा हटवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. आता त्या जागी स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर-जनरल सी. राजगोपालाचारी (राजाजी) यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे.

सी. राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. याआधी त्या ठिकाणी ब्रिटिश वास्तुविशारद एडविन लुटियन्स यांचा अर्धपुतळा होता. लुटियन्स यांनी नवी दिल्लीतील अनेक प्रतिष्ठित वास्तूंची रचना केली होती. राष्ट्रपती भवनातील अशोक मंडपाजवळील ग्रँड ओपन स्टेअरकेसवर लुटियन्स यांच्या अर्धपुतळ्याच्या जागी राजगोपालाचारी यांचा अर्धपुतळा स्थापित करण्यात आला. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर उपस्थित होते.

शहराचं नाही मोदी सरकार आता थेट राज्याचंच नाव बदलणार, प्रस्तावाला दिली मंजूरी

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी झालेल्या ‘मन की बात’च्या १३१ व्या भागात लुटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागी राजगोपालाचारी यांचा पुतळा बसवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली. त्या वेळी मोदी म्हणाले होते की, देश आता गुलामगिरीची चिन्हे मागे सोडत असून भारतीय संस्कृतीशी निगडित प्रतीकांना प्राधान्य देत आहे. राजाजी यांच्या नवीन अर्धपुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती मुर्मू यांनी ‘राजाजी उत्सव’च्या निमित्ताने केले. या उत्सवाअंतर्गत आयोजित प्रदर्शन १ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

राष्ट्रपती भवनातील भव्य खुल्या पायऱ्यांच्या एका कोपऱ्यात हा अर्धपुतळा स्थापित करण्यात आला आहे. राष्ट्रपती सचिवालयाने स्पष्ट केले की, वसाहतवादी मानसिकतेचे अवशेष दूर करण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या पावलांपैकी हा एक भाग आहे. विशेष म्हणजे, ज्या इमारतीची रचना लुटियन्स यांनी स्वतः केली होती, त्याच इमारतीतून आता त्यांची प्रतिमा हटवण्यात आली आहे.

लुटियन्स यांच्या सुरुवातीच्या आयुष्याविषयी माहिती त्यांच्या मुलगी मेरी लुटियन्स यांनी दिली आहे. लुटियन्स ट्रस्टने प्रकाशित केलेल्या लेखनात त्यांनी नमूद केले आहे की, एडविन लुटियन्स यांचा जन्म २९ मार्च १८६९ रोजी झाला. ते चार्ल्स आणि मेरी लुटियन्स यांच्या तेरा मुलांपैकी दहावे अपत्य आणि नववे पुत्र होते. त्यांचे वडील कॅप्टन चार्ल्स ऑगस्टस हेन्री लुटियन्स हे सैनिक आणि चित्रकार होते, तर आई मेरी थेरेसा गॅलवे आयर्लंडमधील गृहिणी होत्या. लहानपणी संधिवाताच्या तापामुळे ते खूप अशक्त होते, त्यामुळे त्यांनी पारंपरिक सार्वजनिक शाळा किंवा विद्यापीठात शिक्षण घेतले नाही. त्यांचे टोपणनाव ‘नेड’ असे होते.

Exit mobile version