Download App

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; ५ फेब्रुवारीला होणार मतदान तर ‘या’ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रासारखच येथील मतदान हे एकाच टप्प्यात होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या

  • Written By: Last Updated:

Delhi Assembly elections announced : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मदतान होणार असून ८ फेब्रुवारीला होणार मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रासारखच येथील मतदान हे एकाच टप्प्यात होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आजपासून दिल्ली विधानसभा क्षेत्रात अचारसंहिता लागू झाली आहे.

ईव्हीएम मशिन हॅक होत नाही

देशाच्या अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक रेकॉर्ड तयार झाले. अनेक नवतरुणांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग नोंदवला. आगामी काळात देखील लोकशाही मजबूत करण्यासाठी हे टक्केवारी अधिक वाढत जाईल. किंबहुना प्रत्येक निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आरोप होतच राहतात. कुठल्याही यंत्रणेनं ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही.

यंत्रणात चूक असेल, वैयक्तिक चूक असेल तर दाखवा तत्काळ कारवाई करू. सोबत ईव्हीएम संदर्भातील आरोपांवर ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असे कोर्टानेही म्हटले आहे. त्यामुळे वायरस किंवा इतर यंत्रणांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे सांगत केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी राज्यातील निवडणुकांवरील आरोपांवर उत्तर दिले आहे.

अवघ्या 8 जागांवर

दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. या निवडणुकीत ‘आप’ने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजपला अवघ्या 8 जागांवर विजय मिळाला होता. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने दिल्लीत वर्चस्व राखले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया यांच्यासह ‘आप’च्या प्रमुख नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा काही प्रमाणात डळमळीत झाली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे 

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना कधी निघणार?- 10 जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख- 17 जानेवारी
उमेदवारी अर्ज छाननी करण्याची तारीख- 18 जानेवारी
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख- 20 जानेवारी
मतदानाची तारीख- 5 फेब्रुवारी
निकालाची तारीख- 8 फेब्रुवारी

 

 

follow us

संबंधित बातम्या