Download App

मोदींबद्दल अपशब्द; मल्लिकार्जून खर्गेंच्या मुलाला निवडणूक आयोगाची नोटीस…

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा मुलगा आणि आमदार प्रियांक खर्गे यांनी निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आलीय. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांक खर्गेंनी पंतप्रधान मोदींबद्दल ‘नालायक’ असा शब्द वापरला होता.

राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, लखनऊ कोर्टाने सावरकर प्रकरणात दिला मोठा आदेश

येत्या 10 मे रोजी कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी मतदार पार पडणार आहे. कर्नाटक निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सभा, रॅलीच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे.

Maharashtra BJP : कार्यकारिणीत तळागाळात झटणाऱ्या कार्यकर्त्यांना मानाचे पान; राजकीय हस्तक्षेपाला लावला चाप

कर्नाटकात एका निवडणूक रॅलीत प्रियांक खर्गे यांनी पंतप्रधान मोदींविषयी अपमानजनक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर सोनिया गांधींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाने भाजप आमदार बसनगौडा आर पाटील (यत्नाल) यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकापूर्वी संशयास्पद हालचाली, एकाला अटक

बसनागौडा हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. अलीकडेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील त्यांच्या एका निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींसाठी ‘विषारी साप’ शब्द वापरल्यानंतर, बसनगौडा यांनी सोनिया गांधींसाठी ‘विष्कन्या’ शब्द वापरला होता.

निवडणूक आयोगाने प्रियांक खर्गेंवर कारवाई का करु नये अशी विचारणा केली असून खर्गेंनी 4 मे रोजीपर्यंत निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी वेळी दिला आहे. कर्नाटकातील भाजप नेत्यांकडून प्रियांका यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बसनगौडा यांच्याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

Tags

follow us