राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, लखनऊ कोर्टाने सावरकर प्रकरणात दिला मोठा आदेश
Rahul Gandhi on Savarkar ; उत्तर प्रदेशातील लखनऊ न्यायालयाने (Lucknow Court) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या सावरकर प्रकरणाचे चौकशीचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण राहुल गांधींनी केलेल्या कथित टिप्पणीशी संबंधित आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकर (VEER SAVARKAR) यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.
लाइव्ह लॉच्या अहवालानुसार, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी सीआरपीसीच्या कलम १५६ (३) अंतर्गत हा आदेश दिला आहे. अधिवक्ता नृपेंद्र पांडे यांनी दाखल केलेल्या अपिलावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे. या प्रकरणाची चौकशी उपनिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. हजरतगंज पोलीस ठाण्याला तपासाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोर्टाच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 जून रोजी होणार आहे.
4 वर्षांनंतर आयपीएल सामना रद्द, लखनौ-चेन्नईला प्रत्येकी एक गुण
वकील नृपेंद्र पांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत राहुल गांधी यांनी 17 नोव्हेंबरला समाजात द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. राहुल यांनी विनायक दामोदर सावरकरांना इंग्रजांचे नोकर म्हटले होते. सावरकरांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतली होती असेही ते म्हणाले होते. याचिकेत पुढे म्हटले आहे की, सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक होते. भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी अनेक अमानुष अत्याचार सहन केले.
लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, राहुल गांधींवर वीर सावरकरांबद्दल न्यूनगंड पसरवण्यासाठी अपशब्द वापरल्याचा आरोपही करण्यात आला होता. याचिकेत म्हटले आहे की, महात्मा गांधींनी वीर सावरकरांना देशभक्त म्हटले होते, मात्र राहुल गांधी आपल्या वक्तव्याने समाजात त्यांच्याविरोधात द्वेष निर्माण करत आहेत. त्यामुळे तक्रारदाराला मानसिक त्रास सहन करावा लागला आहे.
कर्नाटकमध्ये झाडांवरुन पैशांचा पाऊस; नेमकं प्रकरण काय?
राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारत जोडो यात्रा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना सावरकरांनी ब्रिटिशांना मदत केल्याचा दावा केला होता. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहून ‘मला तुमचे सेवक व्हायचे आहे’ असे राहुल म्हणाले होते. सावरकरांनी घाबरूनच माफीनाम्यावर स्वाक्षरी केल्याचा दावाही त्यांनी केला होता.