लोकसभेचे बिगुल वाजले; देशात सात टप्प्यांमध्ये मतदान, चार जूनला होणार मतमोजणी

नवी दिल्ली : अखेर मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेसाठी पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (16 मार्च) विज्ञान भवनात पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेसोबतच, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा केली. यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान […]

Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024

नवी दिल्ली : अखेर मागील अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या 18 व्या लोकसभेसाठी पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (16 मार्च) विज्ञान भवनात पत्रकार परिषदेमध्ये लोकसभेसोबतच, अरुणाचल प्रदेश, सिक्किम, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचीही घोषणा केली. यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात एकूण सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. यानंतर चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. या घोषणेनंतर देशात आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. (Election for the 18th Lok Sabha has been announced by the Election Commission of India)

असा असणार निवडणूक कार्यक्रम

एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यात पहिल्या टप्प्यासाठी 19 एप्रिल, दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे, चौथ्या टप्यासाठी 13 मे, पाचव्या टप्यासाठी 20 मे, सहाव्या टप्यासाठी 25 मे आणि सातव्या टप्यासाठी एक जून रोजी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रामध्ये पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. तर चार जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्ये :

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीत देशभरातून 96 कोटी 80 लाख मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी 49.7 कोटी पुरुष आणि 47 कोटी महिला मतदार आहेत. तर 48 हजार ट्रान्सजेंडर मतदारही मतदान करणार आहेत. यामध्ये 21 कोटी 50 लाख युवा मतदार आहेत. त्यातही एक कोटी 82 लाख प्रथम मतदारअसणार आहेत. याशिवाय 82 लाख मतदार 85 वर्षांवरील आहेत, तर 2 लाख 18 हजार मतदार हे 100 वर्षांवरील आहेत. या सर्वांसाठी 10 लाख 50 हजार मतदान केंद्रे असणार आहेत. तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. यासाठी दीड कोटी मतदान अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत.

याव्यतिरीक्त प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ अधिका-यांच्या अखत्यारित 24 तास कंट्रोल रूम सुरू असणार आहे. कुठेही हिंसा होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.  कोणी मुफ्त वस्तू कोणी वाटत असेल, पैसा वाटप होत असेल तर निवडणूक आयोगाला कळविण्याचे आवाहनही मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले. या तक्रारीवर 100 मिनिटात कारवाई केली जाईल, असेही आश्वासन त्यांनी दिले. यासोबतच ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना तीनवेळा न्यूज पेपर, वृत्तवाहिन्यांमध्ये मध्ये माहिती द्यावी लागणार आहे. राजकीय पक्षांनाही तुम्हाला गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला उमेदवार का मिळाला नाही, याची माहिती द्यावी लागणार आहे.

Exit mobile version