Download App

मोठी बातमी : लोकसभा तोंडावर असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Election Commissioner Arun Goel Resigns: लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. या निवडणुकीची भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच निवडणूक आयुक्त अरुण गोयल (Arun Goel) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी त्यांनी राजीनामा दिलाय. त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. त्यांनी का राजीनामा दिला आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागणार आहे. त्याचपूर्वी अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी याबाबत विधी व न्याय विभागाने अधिसूचना जाहीर केली आहे. अरुण गोयल यांनी पदाचा राजीनामा दिल्याने आता निवडणूक आयुक्तांचे दोन्ही पदे रिक्त झाले आहेत. गोयल यांनी 21 नोव्हेंबर 2022 निवडणूक आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ते 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. ते अवजड उद्योग मंत्रालयात सचिव होते. ते मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांड्ये यांच्याबरोबर निवडणूक आयुक्तपदावर आले होते. ते 2027 पर्यंत पदावर राहू शकले असते. परंतु त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

तीन सदस्यात दोनपदे रिक्त
फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडेय यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते निवृत्त झाले. आता अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर जबाबदारी आली आहे.

follow us

वेब स्टोरीज