Download App

तेलंगणात ओवेसींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त, मुस्लीम व्होटबँक कोणाच्या पारड्यात?

Telangana Election Result : एकीकडे तेलंगणातील (Telangana Election Result) मतदारांनी काँग्रेसकडे (Congress) सत्तेची चावी दिली असतानाच दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या एआयएमआयएमला (AIMIM) मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपने ओवेसींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला आहे. हैदराबाद आणि आसपासच्या जागा एकतर्फी जिंकलेल्या ओवेसींचा पक्ष यावेळी आपल्या जागा वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे.

तेलंगणात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ओवेसींच्या AIMIM ने 7 जागा जिंकल्या होत्या. या सर्व जागा हैदराबाद लोकसभा मतदारसंघात येतात, परंतु यावेळी AIMIM चे उमेदवार या सातपैकी 4 जागांवर पिछाडीवर आहेत. AIMIM केवळ 3 जागांवर पुढे आहे. यावेळी 9 जागांवर AIMIM निवडणूक लढवत आहे. ओवेसींचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादमधील 7 जागा आणि इतर दोन जागांवर यावेळी AIMIM कशी कामगिरी करतोय ते पाहूया.

मलकपेठ
मलकपेठ विधानसभा जागेवर तिसऱ्या ट्रेंडमध्ये AIMIM चे अहमद बिन अब्दुल्ला बलाला आघाडीवर होते. भाजपचे समरेड्डी सुरेंदर रेड्डी येथे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. AIMIM 2018 मध्ये येथे विजयी झाले होते.

Chhattisgarh Election : भाजप जिंकला तर छत्तीसगडचा CM कोण? ‘या’ नेत्यांची नावं आघाडीवर

कारवाँ
गेल्या निवडणुकीत एआयएमआयएमने कारवाँची जागा जिंकली होती, परंतु यावेळी भाजपचे अमरसिंह तिसऱ्या ट्रेंडमध्ये आघाडीवर होते. येथे बीआरएस उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे AIMIM तिसऱ्या क्रमांकावर आहे.

गोशामहल
गोशामहल मतदारसंघातून भाजपचे टी. राजा सिंह आघाडीवर आहेत. याआधीही ते या जागेवरून आमदार होते. 2018 मध्ये ते भाजपचे एकमेव आमदार होते. मात्र, यावेळी एआयएमआयएमने आपला उमेदवार उभा केला नाही.

Telangana Election Result : ABVP तून सुरुवात, नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश, CM पदाचा चेहरा रेवंत रेड्डी नेमके कोण?

चारमिनार
चारमिनार विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या ट्रेंडमध्ये AIMIM चे मीर झुल्फिकार अली आघाडीवर होते. गेल्या वेळीही येथे ओवेसींचा पक्ष विजयी झाला होता.

चंद्रयानगुट्टा
असदुद्दीन ओवेसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी या विधानसभा जागेवर निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळीही ते येथून विजयी झाले होते. यावेळी अकबरुद्दीन ट्रेंडमध्ये आघाडीवर होते.

KCR यांचे काय चुकले? राष्ट्रीय राजकारणात जात असतानाच स्वतःच्याच राज्याकडे केलेले दुर्लक्ष!

जुबली हिल्स
या जागेवर काँग्रेसचे अझरुद्दीन आणि विद्यमान आमदार बीआरएसचे एम. गोपीनाथ यांच्यात चुरशीची लढत आहे. तिसऱ्या ट्रेंडमध्ये बीआरएसचे गोपीनाथ आघाडीवर होते, तर अझरुद्दीन 2 हजार मतांनी मागे होते. आश्चर्याची बाब म्हणजे या जागेवर AIMIM चे फराजुद्दीन चौथ्या क्रमांकावर होते.

राजेंद्र नगर
तिसऱ्या ट्रेंडमध्ये या जागेवर बीआरएसचा उमेदवार पहिल्या क्रमांकावर होता, तर काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. या जागेवर एआयएमआयएमचे उमेदवार खूप लोकप्रिय होते, मात्र त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळालेला नाही. ते चौथ्या क्रमांकावर आहेत. ओवेसी यांनी या जागेवर मंदगिरी स्वामी यादव यांना तिकीट दिले होते.

Rajasthan : गेहलोतांची जादू पडली फिकी; रणथंबोर काबीज करणाऱ्या भाजपच्या विजयाची 5 कारणं

या जागांवरही चुरस पाहायला मिळाली
वरील जागांशिवाय हैदराबादमधील याकूतपुरा आणि बहादूरपुरा जागेवरही ओवेसींच्या पक्षाच्या उमेदवारांची चुरस पाहायला मिळाली. मात्र, तिसऱ्या ट्रेंडमध्ये एआयएमआयएमचे उमेदवार पुढे होते.

कर्नाटक गमावलं, तेलंगणाने नाकारलं; ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम अजूनही भाजपच्या टप्प्याबाहेरच

या नुकसानाचे कारण काय?
ओवेसींना मुस्लिम राजकारणाचा मोठा चेहरा मानले जाते. गेल्या काही वर्षांत त्यांनी जवळपास प्रत्येक राज्यात मुस्लीम व्होटबँक तयार केली असून अनेक राज्यांत त्यांनी आपला पक्ष उभा केला आहे. ओवेसींनी येथे चूक केली असे राजकीय जाणकारांचे मत आहे. आपल्या गृहराज्यात ते फक्त 9 जागांवर निवडणूक लढवतात, तर इतर राज्यांमध्ये ते 20-30 किंवा त्याहून अधिक जागांवर उमेदवार उभे करतात.

काँग्रेस सतत ओवेसींच्या पक्षाला भाजपची बी टीम म्हणत आहे. भाजपला फायदा व्हावा यासाठी मुस्लिम व्होटबँकेत फूट पाडल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. बऱ्याच अंशी मुस्लिम मतदारांनाही हे समजू लागले आहे. तेलंगणात ज्या प्रकारे काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे, त्यावरून काँग्रेसला मुस्लिम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट होते.

Tags

follow us

वेब स्टोरीज