Download App

Mamata Banerjee : ममतांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; जखमी बॅनर्जींना तातडीने रुग्णालयात हलवले

  • Written By: Last Updated:

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. त्यावेळी हेलिकॉप्टरला जोरदार झटके बसले. त्यात बॅनर्जी या जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या खांद्याला, कमेराला, पायाला दुखापत झालेली आहे.(emergency landing of cm mamata banerjee helicopter banerjee was immediately shifted to hospital)

पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहे. त्या ठिकाणी भाजपकडून जोर लावण्यात आलेला आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी प्रचाराचा धडका लावला आहे. मंगळवारी दुपारी बॅनर्जी या जलपाईगुडी येथील सभा संपवून बागडोगरा येथे जात होत्या. पावसामुळे हवामान खराब झाले होते. पायलटने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. सालुगाडा येथील आर्मी एअरबेसवर त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. त्यामुळे हेलिकॉप्टरला जोरदार झटके बसले. त्यात बॅनर्जी यांना दुखापत झाली. त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर, ‘एक रुपयाही…’

ममता बॅनर्जी या हेलिगो चार्टर्स प्राइवेट लिमिटेडच्या EC-145 हेलिकॉप्टरने प्रवास करत होत्या. बागडोगरा येथे तुफान पाऊस सुरू होता. त्यामुळे हेलिकॉप्टरचा मार्ग बदलण्यात आला होता. परंतु हेलिकॉप्टर झटके बसले होते. या घटनेनंतर राज्यपाल सीवी आनंद यांनी ममता बॅनर्जी यांची विचारपूस केली आहे.

<a href=”https://letsupp.com/national/rajya-sabha-elections-will-be-held-on-july-24-on-10-rajya-sabha-seats-of-bengal-gujarat-and-goa-61800.html”>राज्यसभेसाठी भाजपची कसोटी; 10 जागांसाठी निवडणूक जाहीर

दोन वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी झाल्या होत्या जखमी. 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी नंदीग्राम येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या ममता बॅनर्जी जखमी झाल्या होत्या. त्यावेळी बॅनर्जी यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यावेळी तीन दिवस हॉस्पिटलमध्ये त्या अॅडमिट होत्या. त्यांनी व्हिलचेअरवर विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला होता.

Tags

follow us