70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर, ‘एक रुपयाही…’

70 हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवर शरद पवारांचे मोदींना प्रत्युत्तर, ‘एक रुपयाही…’

Sharad Pawar on Narendra Modi : भोपाळमध्ये बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. मोदींच्या या आरोपाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ज्या शिखर बँकेचा मुद्दा काढला. त्या बँकेचा मी कधीही साधा सदस्य नव्हतो. त्यात माझा काही संबंध नसल्याचे कोर्टात सिद्ध झाले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की देशाच्या पंतप्रधानांनी जे आज आरोप केले ते कितपत योग्य म्हणावे. कारण त्यांनी ज्या शिखर बँकेचा मुद्दा काढला. त्या बँकेचा मी कधीही साधा सदस्य नव्हतो. तर कधी लोन किंवा कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही. त्यात माझ्यावर पक्षावर केलेला आरोप चुकीचे आहे.

विशेष बाब म्हणजे यापूर्वी देखील शिखर बँकेतील गैरव्यवहाराची चर्चा झाली. हे सर्व प्रकरण कोर्टात गेले. त्यात माझा काहीच संबंध नसल्याचे सिद्ध झाले आहे. तरी देखील असे आरोप करणे हे काही योग्य नाही, अर्थात यावर मला काहीही बोलायचे नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

बॅंकेच्या प्रत्येक शाखेत देवेंद्र फडणवीसांचे तैलचित्र लावा, सदावर्तेंचे बॅंकेला निर्देश

तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादीला मतदान करा, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे केले होते. त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की अशा प्रकरणात सुप्रिया सुळेंचे नाव घेण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांनी असे आरोप करण्याचे काहीच कारण नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

आधी पक्ष फोडला, आता आणखी एक तगडा प्लॅन; ‘BRS’ च्या पराभवासाठी काँग्रेसचा नवा डाव!

शरद पवारांनी बीआरएसमध्ये प्रवेश केलेल्या भगीरथ भालकेंवरही टीका केली आहे. एखादी व्यक्ती गेली तर फार चिंता करायची गरज नसते. भालके यांना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं होतं की आमची ही निवड चुकीची होती, असे त्यांनी म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube