आधी पक्ष फोडला, आता आणखी एक तगडा प्लॅन; ‘BRS’ च्या पराभवासाठी काँग्रेसचा नवा डाव!
Telangana Assembly Election : कर्नाटकातील विजयानंतर उत्साहित झाले्ल्या काँग्रेसने आता तेलंगाणावर लक्ष केंद्रीत केले आहे. तसाही काँग्रेसने (Congress) एक मोठा झटक के. चंद्रशेखर राव (K. Chancrashekhar Rao) यांना दिला आहे. काल केसीआर यांच्या पक्षातील काही पदाधिकारी आणि माजी आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशभरात पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राज्याचा दौरा तर करत आहेतच शिवाय स्थानिक नेत्यांबरोबर चर्चाही करत आहेत. आगामी निवडणुकांत केसीआर यांचा पराभव करण्यासाठी पूर्ण ताकद लावण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे. अन्य पक्षांकडूनही नेते मंडळींना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Manipur violence: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, विरोधकांनी अमित शहांना घेरले
मिळालेल्या माहितीनुसार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी आणि जुपल्ली कृष्णा राव यांच्यासह बीआरएसचे अन्य 35 नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबरोबर भेट झाली आहे. माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी येत्या 2 जुलै रोजी खम्मम येथे राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. जुपल्ली कृष्ण राव 14 किंवा 16 जुलै रोजी प्रियंका गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. तसेच अन्य पक्षांतील नेतेही पक्ष प्रवेशष करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
असेही सांगण्यात येत आहे की काही भाजप नेते देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये कोमाटिरेड्डी राजगोपाल रेड्डी, इटेला राजेंदर या नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हैदराबाद येथे बैठक घेतली होती. या बैठकीतही हे नेते उपस्थित नव्हते.
PM मोदींनी ज्यांचा उल्लेख केला, ते पसमांदा मुस्लिम आहेत तरी कोण? त्यांचा इतिहास काय?
दरम्यान, केसीआर यांच्या बीआरएसने महाराष्ट्रात पक्ष विस्ताराचा धडाकाच लावला आहे. आजच के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते भगिरथ भालके यांनी पक्षात प्रवेश केला. केसीआर आज त्यांच्या मंत्रिमंडळासह पंढरपुरात आले होते. सकाळी त्यांनी पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी जाहीर सभेत भालके यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. या व्यतिरिक्त राज्यात अन्य ठिकाणीही अन्य पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत.