Download App

कर्मचाऱ्यांना गुडन्यूज! PF अकाउंट ट्रान्सफर करणं आणखी सोपं; EPFO ने केला ‘हा’ बदल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ईपीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी एम्प्लॉयरच्या परवानगीची अट काढून टाकण्यात आली आहे.

EPFO Account Transfer : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) संघटनेने शुक्रवारी फॉर्म 13 मध्ये बदल केला. याबरोबरच ईपीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्यासाठी एम्प्लॉयरच्या मंजुरीची अट काढून टाकण्यात आली आहे. खासगी क्षेत्रात जेव्हा कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत रुजू होतो त्यावेळी कर्मचाऱ्याला ईपीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्याची गरज पडते. आता ईपीएफओने घेतलेल्या या निर्णयामुळे कोट्यावधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांना आता जॉब चेंज केल्यानंतर पीएफ अकाउंट ट्रान्सफर करण्यात अडचणी कमी होणार आहेत.

आतापर्यंतची कार्यवाही पाहिली तर पीएफ अकाउंट ट्रान्सफर सोर्स ऑफीस आणि डेस्टिनेश ऑफीस दोन्हींच्या भागीदारीने होत होते. आता नवीन नियमानुसार ईपीएफओ अकाउंट ट्रान्सफरमध्ये डेस्टिनेशन ऑफीसच्या अॅप्रू्व्हलची गरज राहणार नाही. फक्स सोर्स ऑफीसच्या अॅप्रूव्हलने काम होणार आहे. अकाउंट ट्रान्सफरची प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी ईपीएफओने फॉर्म 13 सॉफ्टवेअरला लाँच केले आहे.

ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी बातमी; देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार

दरवर्षी 90 हजार कोटी रुपये ट्रान्सफर

एकदा सोर्स ऑफीसकडून क्लेम मंजूर झाल्यानंतर अकाउंट आपोआप डेस्टिनेशन ऑफीसमध्ये ईपीएफओ सदस्याच्या सध्याच्या खात्यात ट्रान्सफर होईल. या निर्णयामुळे 1.25 कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. यामुळे दरवर्षी जवळपास 90 हजार कोटी रुपये ट्रान्सफर होऊ शकतील. अकाउंट ट्रान्सफर प्रक्रियेला वेग येईल अशी माहिती ईपीएफओने एका निवेदनात दिली आहे.

दरम्यान, याआधी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेत EPFO च्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीय पेन्शन सिस्टीम लागू केली आहे. (EPFO) हे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्यात आलं होतं. डिसेंबर 2024 पर्यंत 68 लाख पेन्शनर्सना जवळपास 1570 कोटी रुपयांची पेन्शन वाटण्यात आली आहे. या बदलामुळं देशातील कोणत्याही बँकेत, कोणत्याही शाखेतून पेन्शनर्स त्यांच्या पेन्शनची रक्कम काढू शकतात. त्यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत. या निर्णयाचा असा देखील अर्थ आहे की ईपीएफओ पेन्शनर्स देशातील कोणत्याही प्रादेशिक ईपीएफओ कार्यालयातून त्यांची पेन्शन काढू शकतात. केंद्रीय पेन्शन पेमेंट सिस्टीम देशातील 122 ईपीएफओ कार्यालयांमध्ये लागू करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांना सरकारचं गिफ्ट! ईपीएफओच्या बैठकीत होणार पीएफच्या व्याज वाढीचा निर्णय

follow us