Exit Poll 2023 MP : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (Exit Poll 2023 MP) रविवारी जाहिर होणार आहेत. त्या अगोदर जाहिर होणाऱ्या एक्झिट पोलची लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. त्यामध्ये आज 30 नोव्हेंबरला तेलंगणामध्ये 119 जागांसाठी अखेरचे मतदान पार पडले. त्यानंतर लगेचच एक्झिट पोलची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. त्यामध्ये पोलस्टार यांनी जाहिर केलेल्या मध्याप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यामध्ये कॉंग्रेस बाजी मारणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
NIV मध्ये नोकरीची संधी, दहावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज, महिन्याला 1 लाख 12 हजार पगार
मध्यप्रदेशात ‘हा’ पक्ष मारणार बाजी
एक्झिट पोलची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. त्यामध्ये पोलस्टार यांनी जाहिर केलेल्या मध्याप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यामध्ये कॉंग्रेस बाजी मारणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये मध्यप्रगेशात कॉंग्रेस 111 ते 121 जागा जिंकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर भाजपच्या पारड्यात 106 ते 116 जागा मिळणार असल्याचं पोलस्टार यांनी त्यांच्या सर्व्हेमध्ये सांगितलं आहे. त्याचबरोबर इतर 6 जागा जिंकणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
एक्झिट पोलची आकडेवारी समोर
पोलस्ट्रॅट – कॉंग्रेस – 111 ते 121 , भाजप- 106-116, इतर – 00 ते 06
आज तक अॅक्सिस – कॉंग्रेस – 111 ते 121 , भाजप- 106-116, इतर – 00 ते 06
मॅट्रीझ – कॉंग्रेस – 97 ते107 , भाजप- 118 ते 130, इतर – 00 ते 02
जन की बात – कॉंग्रेस – 102 ते 125 , भाजप- 100 ते 123, इतर – 00 ते 05
Election 2023 Exit Poll : एक्झिट पोल अन् ओपिनियन पोलमध्ये नेमका फरक काय?
लोकांना एक्झिट पोलची प्रचंड उत्सुकता लागली आहे. कारण यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकांचे निकाल येण्याअगोदरच कोणता पक्ष निवडणून येणार, किती जागा येणार याचा अंदाज बांधला जातो. यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सर्व्हेक्षण केले जाते. ते मतदान संपण्याच्या 30 मिनिट अगोदर जाहिर केले जातात. त्यासाठी मतदारांचे सर्व्हेक्षण केले जाते. सर्व्हे एजन्सी त्यासाठी मोठ्या टीम कामाला लावतात. ही टीम मतदानाच्या दिवशी यावर काम करते. मात्र हा एक अंदाज असतो.
या एक्झिट पोलची सुरूवात 56 वर्षांपूर्वी अमेरिकेमध्ये झाली होती. त्यानंतर जगातील अनेक देशांनी या पद्धतीचा अवलंब केला. तसेच या एक्झिट पोलचे जनक म्हणजे रिसर्च आणि सर्व्हेक्षणामध्ये आवड असणारे अमेरिकन राजकारणी पॉल्सटर वॉरेन हे होय. 1967 मध्ये अमेरिकन राजकारणी पॉल्सटर वॉरेन यांनी पहिल्यांदा आणि सर्वात मोठा एक्झिट पोल बनवला होता. त्यांनी एका संस्थेसाठी हा एक्झिट पोल तयार केला होता. त्यानंतर हा प्रकार प्रचलित झाला. त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवणुकीमध्ये एक्झिट पोल जाहिर केले जाऊ लागले. अनेक वृत्तसंस्थांनी अशा प्रकारे एक्झिट पोल जाहिर करायाला सुरू केले.