Fake IAS Officer With Driverless Tesla And ₹100 Crore Assets Arrested : टेस्ला कार, आलिशान घर, उच्च राहणीमान आणि शंभर कोटी रुपये ही तुम्ही म्हणाल ही संपत्ती एखाद्या उद्योगपतीची. पण ती आहे एका आयएएस अधिकाऱ्याची. ती ही बनावट आयएसएस अधिकाऱ्याची. ती अधिकारी दहावीमध्ये टॉपर राहिलेला आहे. बिहारमध्ये बनावट अधिकारी मनीष गुप्ताला अटक करण्यात आल्यानंतर ही संपत्ती उघडकीस आले आहे.
10वीचा टॉपर राहिलेल्या मनीष गुप्तावर बनावट IAS अधिकारी बनून मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे. आरोपीने आपली बनावट ओळख अशा पद्धतीने निर्माण केली होती की, तो दीर्घकाळ प्रशासकीय आणि व्यावसायिक वर्तुळात प्रभावशाली अधिकारी म्हणून वावरत होता. आरोपीने बनावट ओळखीच्या आधारे सुमारे 100 कोटी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती उभी केली. यादरम्यान त्याने केवळ सरकारी यंत्रणांची दिशाभूल केली नाही, तर अनेक प्रभावशाली व्यक्ती आणि व्यावसायिकांनाही आपल्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप आहे. त्याची जीवनशैली एखाद्या मोठ्या उद्योगपतीपेक्षा कमी नव्हती. पोलिसांनी त्याच्याकडून ‘भारत सरकार’ असे चिन्ह असलेल्या दोन आलिशान गाड्या, त्यापैकी एक ड्रायव्हरलेस टेस्ला, 31 लिटर विदेशी मद्य, आयफोन, विविध कार्ड्स आणि संरक्षित बाराशिंगाच्या अनेक वस्तू जप्त केल्या आहेत.
तपास यंत्रणांना त्याच्या ठिकाणांवर एक अत्यंत आलिशान बंगला आढळला. या बंगल्याची तुलना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या
मुंबईतील अँटीलिया घरांशी केली जातेय. घरातील सजावट, सुरक्षा व्यवस्था आणि आलिशान सुविधांमुळे तपास अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहे. याशिवाय त्याच्याकडून अनेक महागड्या आणि आधुनिक कारही जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात एक टेस्ला कारही आहे.
वीस बँक खाते आणि 20 हून अधिक क्रेडिट कार्ड
आर्थिक तपासात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. आरोपीच्या नावावर 8 बँक खाती आणि 20 हून अधिक क्रेडिट कार्ड कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती मिळाली आहे. आता पोलीस आणि आर्थिक गुन्हे शाखा या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करत आहे. या प्रकरणामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एकटाची आणखी कुणी साथीदार ?
तपास यंत्रणांना या संपूर्ण फसवणुकीमागे एका संघटित टोळीचा सहभाग असल्याचाही संशय आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यापासून ते प्रभावशाली ओळख निर्माण करण्यापर्यंत या टोळीने आरोपीला मदत केल्याची शक्यता तपासली जात आहे. त्यामुळे बनावट आएसएस अधिकारी म्हणून त्याची ओळख मजबूत करण्यासाठी मदत करणाऱ्या व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे.सध्या आरोपीची चौकशी सुरू असून, येत्या काही दिवसांत या हाय-प्रोफाइल फसवणूक प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
