Download App

राहुल गांधी PM होणार; प्रसिद्ध लेखकाने कारणं सांगत काँग्रेसला दिली ‘गूड न्यूज’

 राहुल गांधी भविष्यात देशाचे पंतप्रधान असू शकतील असा दावा प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी एका कार्यक्रमात केला.

Rahul Gandhi : मागील दहा वर्षांपासून सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसला २०२४ मधील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) टॉनिक देणाऱ्या ठरल्या आहेत. लोकसभेच्या ९९ जागा जिंकल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीत (INDIA Alliance) वीस पेक्षा जास्त पक्ष असले तरी राहुल गांधींनाच सर्व विरोधी पक्षांचा नेता तसेच भविष्यातील पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. यातच आता प्रसिद्ध लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) यांनी राहुल गांधींबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. राहुल गांधी भविष्यात देशाचे पंतप्रधान असू शकतील असा दावा भगत यांनी इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात केला.

राजीव गांधी फाउंडेशनमध्ये किती SC- ST, राहुल गांधींच्या दाव्यावर अर्थमंत्र्यांनी दिलं प्रत्युत्तर

भगत म्हणाले राहुल गांधींच्या इमेजमध्ये आता सुधारणा झाली आहे. यामागे तीन कारणे आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व आता पूर्णपणे बदललं आहे. आधी मला त्यांच्याकडून अतिशय कमी अपेक्षा होत्या कारण त्यावेळी ते तितके सुसंगत वाटत नव्हते. राहुल गांधी जर समजदार पद्धतीने निर्णय घेत असतील तर ते लवकरच देशाचे पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात.

राहुल गांधी धर्मासारखे कठीण मुद्दे सहजपणे उपस्थित करतात. भाजपलाही जोरदार आव्हान देतात. पेपर लीक, अग्निवीर यांसारखे मुद्दे आपल्यासमोर आहेतच. आता लोकांनीही ग्रहण करण्यास सुरुवात केली आहे. आधी अशी परिस्थिती होती की लोक गांधी परिवाराचं म्हणणं ऐकून घेण्यासही तयार नव्हते. राहुल गांधी आता योग्य मार्गावर आहे. राजकारणात योग्य वेळेचं अतिशय महत्व आहे असे भगत म्हणाले.

राहुल गांधींच्या लोकसभेतील भाषणांची देशभरात चर्चा; वाचा, कुणाचा आहे पडद्यामागील आवाज

राहुल गांधींना अनेकांनी पप्पू ठरवलं होतं. त्यामुळे लोकांची त्यांच्याकडे पाहण्याचा धारणाही तशीच झाली होती. पण, राहुल गांधींनी ही इमेज बदलण्यासाठी संघर्ष केला आणि यामध्ये बदल घडवून आणला. राहुल गांधी आता वेगळ्याच मूडमध्ये दिसतात आणि वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत, असे चेतन भगत यांनी सांगितले.

follow us