मोदी म्हणाले, केजरीवाल अनुभवी चोर; दिल्लीच्या सीएमचा पीएम मोदींसह, ईडी-सीबीआयवर हल्लाबोल

मोदी म्हणाले, केजरीवाल अनुभवी चोर; दिल्लीच्या सीएमचा पीएम मोदींसह, ईडी-सीबीआयवर हल्लाबोल

Arvind Kejriwal On Pm Modi : देशात लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला आहे. काही राज्यात सहाव्या आणि सातव्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. उद्या 25 मे रोजी सहाव्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi)सातही जागांवर मतदान होणार आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party)प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)यांच्यावर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अनुभवी चोर म्हटले आहे. त्याचबरोबर केजरीवाल यांच्या घरात नोटांचे बंडल का सापडत नाहीत? हेदेखील त्यांनी सांगितले. त्यावर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन पीएम मोदींसह ईडी सीबीआयवर जोरदार निशाणा साधला आहे. (Delhi liquor scam case Arvind Kejriwal Criticize On Pm Narendra modi ED CBI)

चाहत्यांची प्रतीक्षा संपली, जितेंद्र कुमारच्या ‘कोटा फॅक्टरी सीझन 3’ वेब सिरीजची रिलीज डेट आऊट

यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, दोन वर्षांपासून केंद्र सरकार सांगत आहे की, दिल्लीमध्ये दारु घोटाळा झाला. या प्रकरणी माझ्यासह संजय सिंह आणि मनीष सिसोदिया यांना अटक केली. त्या प्रकरणी 500 ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात 100 कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही काळापूर्वी अकराशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगितले. असं असलं तरी त्यात एक पैसादेखील सापडला नाही. या पैशाचे आम्ही काहीतरी तर केले असेल. पण तरीही यात एक रुपया देखील सापडला नाही.

विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ प्रकरणात आणखी दोन कलम वाढविले

केजरीवाल म्हणाले की, नुकत्याच एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींना विचारण्यात आले की, दारु घोटाळ्यात अद्याप कसलेही पुरावे किंवा धागेदोरे का सापडले नाहीत? त्यावर पंतप्रधान मोदींचे एक धक्कादायक वक्तव्य आले. त्यांनी सांगितले की केजरीवाल हे खूप अनुभवी चोर आहेत. त्याचवेळी या घोटाळ्यात आपल्याकडे कोणताही पुरावा नसल्याची कबुली पीएम मोदींनी यावेळी सर्व देशवासियांना दिली, असेही केजरीवाल म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांनी सीबीआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांवर जोरदार निशाषा साधला. यावेळी केजरीवाल म्हणाले की, तुमची सीबीआय आणि तुमचे अधिकारी बेकार आहेत. ईडीचे अधिकारी देखील बेकार आहेत. केजरीवाल हे अनुभवी चोर आहेत हे आपल्या अटकेचे समर्थन करण्यासाठीचे फक्त निमित्त आहे. चौकशी यंत्रणांकडे कसलाही पुरावा नाही, वसुली नाही. जर तुम्ही हे कबूल केले असेल तर आम्हाला सर्व सोडून द्या, असेही यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज