Loksabha Election 2024 : ‘पालघर’वर भाजपचा कब्जा! हेमंत सावरांना उमेदवारी जाहीर

Loksabha Election 2024 : ‘पालघर’वर भाजपचा कब्जा! हेमंत सावरांना उमेदवारी जाहीर

Hemant Savara Will Contest loksabha : महायुतीचा (Mahayuyti) पालघरच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. पालघरची जागा महायुतीत भाजपच्या वाट्याला गेली आहे. या ठिकाणी भाजपने (BJP) माजी मंत्री विष्णू सावरा (Vishnu Savera) यांचे पुत्र डॉ. हेमंत सावरा (Hemant Savara) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मुंबईच्या सर्व जागा जाहीर केल्यानंतर महायुतीने काल ठाणे आणि कल्याणची जागाही महायुतीने जाहीर केली. या दोन्ही जागा कायम राखण्यात शिंदे यांच्या शिवसेनेला यश आले. मात्र पालघरच्या जागेचा तिढा कायमच होता. कारण या जागेवर भापजने दावा केला होता. पालघरची जागा महायुतीत शिंदे गटाकडे होती. या जागी शिंदे गटाचे राजेंद्र गावीत हे विद्यमान खासदार होते. मात्र, आता त्यांचा पत्ता कट झाला आहे. त्यानंतर आज भाजपने एक्सवर एक पोस्ट टाकून पालघरमधून हेमंत सावरा यांना उमदेवारी दिली.

पालघरच्या जागेसाठी आमदार विलास तरे यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मात्र, हेमंत सावरा यांच्या उमदेवारीवर शिक्कामोर्तब झालं आहे. पालघरच्या जागेवर हेमंत सवरा यांना तिकीट द्यावे, असा सल्ला भाजपचे कार्यकर्ते देत होते आणि त्यामुळेच त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. हेमंत सावरा हे 3 मे राजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दरम्यान, पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाने भारती कामडी यांना उमदेवारी दिली आहे. त्यामुळं पालघरमध्ये कामडी विरुध्द हेमंत सावरा अशी लढत होणार आहे. पालघर लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन विधानसभांमध्ये आमदार आहेत. त्यामुळे पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडी महत्त्वाची भूमिका आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube