Farmer Protest : शेतकरी आंदोलनासाठी आजचा दिवस महत्वाचा (Farmer Protest) ठरणार आहे. पंजाब आणि हरियाणाचे (Haryana) शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. पाच पिकांना एमएसपी देण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी धुडकावून लावला आहे. सरकारने 23 पिकांना एमएसपी (MSP) द्यावी अशी मागणी संघटनांनी केली आहे. या घडामोडींनंतर काल सायंकाळी शंभू बॉर्डर येथे शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत संघटनांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला आणि पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल यांनी सांगितले की सरकारी भावना प्रामाणिक नाही. आमच्या मागण्यांवर सरकार गंभीर दिसत नाही. आम्ही 23 प्रकारच्या पिकांना किमान आधारभूत किंमत निश्चित करावी अशी मागणी केली आहे. सरकारने आज जो प्रस्ताव दिला आहे त्याचा फायदा होणार नाही. आता पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली असून उद्या (बुधवार) सकाळी 11 वाजल्यापासून दिल्ली चलो मोहिम (Delhi Chalo March) पुन्हा सुरू केली जाणार आहे.
शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, उद्या रेल्वेचा चक्का जाम, शेतकरी संघटना आक्रमक
शेतकरी मजूर संघर्ष समितीचे महासचिव सरवन सिंह पंधेर म्हणाले, दिल्ली चलो विरोध प्रदर्शन उद्या सकाळपासून सुरू होईल. आम्ही दिल्लीकडे कूच करणार आहोत. आम्हाला विरोध करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे. आंदोलन करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. आता कोणत्याही बैठकीची गरज नाही. सरकारला आता निर्णय घ्यावा लागेल. पंजाब (Punjab) आणि हरियाणाच्या बॉर्डर खुल्या केल्या पाहिजेत.
आम्ही सरकारला विनंती करत आहोत की एकतर सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात नाही तर आम्हाला दिल्लीत येण्याची परवानगी द्यावी. शेतकरी बॅरिकेट्स तोडू इच्छित नाहीत. कुणालाही नुकसान होऊ नये असा प्रयत्न आम्ही करत आहोत. परंतु, सरकार आमचं ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नाही, अशी नाराजी पंधेर यांनी व्यक्त केली.
बीकेयू महासचिव काका सिंह कोटडा म्हणाले, पंजाबातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी आज शंभू बॉर्डर येथे येण्याचे आवाहन केले आहे. पंजाब किसान युनियन, सदा एका जिंदाबाद मोर्चा पंजाब आणि किसान मजदूर नौजवान एकता पंजाब या तीम संघटनांनी खनौर आणि शंभू बॉर्डर येथे येऊन आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा; काळे झेंडे दाखवून शेतकरी आंदोलन करणार
सरवन सिंह पंधेर म्हणाले, सरकारच्या वर्तनात प्रामाणिकता दिसत नाही. सी2+50 या फॉर्म्यूल्यावर सरकार काय करत आहे याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. सरकारचे मंत्री बैठकीत तीन तास उशिराने येतात. इतका वेळ कुणाकडेच नाही. शांततेतच आंदोलने जिंकली जातात. आमचे आंदोलन उग्र व्हावे अशी सरकारची इच्छा आहे. परंतु, आम्ही तसे काही करणार नाही. या प्रश्नावर जर सरकार तोडगा काढू इच्छित नाही तर आम्हाला दिल्लीत येऊ द्यावे.