शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, उद्या रेल्वेचा चक्का जाम, शेतकरी संघटना आक्रमक

शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, उद्या रेल्वेचा चक्का जाम, शेतकरी संघटना आक्रमक

Farmer Protest : देशात 26 महिन्यांनंतर शेतकरी आंदोलनाची आग पुन्हा पेटली आहे. सोमवारी (दि.12) केंद्र सरकारशी (Central Govt)झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही निर्णय न झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा (chalo delhi)नारा दिला. तेव्हापासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं आंदोलन उग्र रुप धारण करताना दिसत आहे.

अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही कोणासोबत….’

एमएसपी कायदा आणि कर्जमाफीसह 12 मागण्यांसाठी दिल्लीपर्यंत मोर्चा काढणाऱ्या पंजाबच्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ हरियाणातील शेतकरी संघटना आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांचं हे आंदोलन दिवसेंदिवस उग्र रुप घेताना दिसत आहे. त्यातच पंजाबमधील शेतकऱ्यांची सर्वात मोठी संघटना भारतीय किसान युनियनने उद्या (दि.15) दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत रेल्वे ट्रॅकवर चक्का जाम करण्याची घोषणा केली आहे.

अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी अन् अजित गोपछडे होणार खासदार! भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर

दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा वापर केल्याने संतप्त शेतकरी संघटनांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी हिस्सार-हंसी, फतेहाबाद येथील शेतकऱ्यांचे गट शंभू आणि दातासिंग वाला सीमेवर पोहोचू लागले आहेत.

पंजाब किसान मजदूर संघर्ष समितीचे सरचिटणीस सर्वन सिंग पंधेर यांनी बुधवारी सरकारला आंदोलक शेतकऱ्यांविरोधात अश्रुधुराचा आणि इतर शक्तींचा वापर थांबवण्याची विनंती केली. मंगळवारी राष्ट्रीय राजधानीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी प्लास्टिक आणि रबराच्या गोळ्या आणि अश्रूधुराच्या गोळ्यांसह स्व-लोडिंग रायफल (SLR) वापरल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये अनेक आंदोलक शेतकरी जखमी झाले आहेत.

मागच्या वेळीपेक्षा यंदा शेतकरी अधिक ताकदीने दिल्लीकडे निघाल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. आतापर्यंत 50 शेतकरी, कामगार संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अनेक सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे सर्व शेतकरी दिल्लीच्या सीमेवरच अडकून पडले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज