शेतकऱ्यांचं वादळ राजधानीच्या सीमेवर धडकलं; मोर्चावर फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

शेतकऱ्यांचं वादळ राजधानीच्या सीमेवर धडकलं; मोर्चावर फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

Farmers Delhi Chalo Protest : देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली आजपासून ‘चलो दिल्ली’चा (Farmers Delhi Chalo Protest)नारा देऊन आक्रमक भूमिका घेतली आहे. या चलो दिल्ली मोर्चामध्ये पंजाब(Punjab), हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील शेतकरी (Farmers)सहभागी झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)राजधानीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. हजारो शेतकरी हे त्यांचे ट्रक, ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या सीमेवर धडकडे आहेत. विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी केंद्र सरकारकडून (Central Govt)चर्चा करण्यात आली मात्र त्यात तोडगा न निघाल्याने हे आंदोलन अत्यंत तीव्र करण्यात आले.

आता बाळासाहेब थोरातांवर काँग्रेसची भिस्त; ‘डॅमेज कंट्रोल’साठी मिळणार मोठी जबाबदारी

आता शेतकऱ्यांचं वादळ हे शंभु सीमेवर धडकलं आहे. दिल्ली पोलिसांनी 12 फेब्रुवारीपासून एक महिनाभरासाठी संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे या सीमेवर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या शेतकरी मोर्चाला पोलिसांनी शंभु सीमेवरच अडवलं. मात्र शेतकऱ्यांनी मागे फिरण्यास नकार दिला. त्यामुळं चांगलंय तणावाचं वातावरण तयार झालं आहे. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्याचवेळी तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांनी असंख्य शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

शंभु सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सिंघू सीमेवर पोलिसांनी नाकेबंदी केली आहे. शेतकरी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळाने म्हटले आहे की, विविध सीमांवर आजपासून सुरु होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षीत निषेधामुळे वाहतुकीवर प्रभाव पडेल. व्यावसायिक वाहनांसाठी, वाहतूक निर्बंध आणि बदल 12 फेब्रुवारीपासून लागू केले जातील. प्रवाशांना सोयीस्कर वाहतुकीच्या पर्यायांसाठी मॅजेन्टा लाइन ते टर्मिनल 1 (T1) किंवा विमानतळ मेट्रो ते टर्मिनल 3 (T3) वापरण्यासाठी प्रोत्साहन देतो.

दिल्ली पोलिसांनी टिकरी सीमा पूर्णपणे सील केली आहे. दिल्लीकडे जाणारे दोन्ही मार्ग बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 रस्त्याच्या मधोमध मोठमोठे दगड टाकून ब्लॉक करण्यात आला आहे.

त्याचवेळी AAP च्या खासदार स्वाती मालीवाल यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी केलेल्या व्यवस्थेवर नाराजी व्यक्त करुन पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पत्रात म्हटलंय की, शेतकऱ्यांना खिळे ठोकून आणि अश्रूधुराच्या नळकांड्याने थांबवले जात असल्याचे दृश्य अत्यंत चिंताजनक आहे. आपण पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांशी चर्चा सुरु करावी आणि त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशी विनंती केली आहे.

भारतीय किसान एकता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लखविंद औलख यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 500 शेतकरी सिरसा येथील महामार्गावरील पंजुआना कालव्यावर जमले आहेत. सकाळी 12 वाजल्यापासून शेतकऱ्यांनी कोणतेच पाऊल उचलले नाही. सिरसाच्या घग्गर पुलावर नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. त्या ब्लॉकपासून 5 किलोमीटर अंतरावर शेतकरी बसले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज