अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही कोणासोबत….’

  • Written By: Published:
अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही कोणासोबत….’

Anil Deshmukh : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्यात आल्याचा निर्णय गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला. या निर्णयानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आता शरद पवार गट काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

नांदेडला एकाच वेळी तीन खासदार, चव्हाणांसोबत राज्यसभेवर जाणारे गोपछडे नेमके कोण? 

आज अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, शरद पवार गट कॉंग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेविषयी विचारले असता देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस विलीन होण्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र राहील. या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत, असं वाटतं. राष्ट्रवादी कॉंग्रेस विलीन होणार या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. कॉंग्रेस, शिवसेना हे आमचे सहयोगी पक्ष आहेत. आम्ही स्वतंत्र चिन्ह घेऊन निवडणूक लढण्याच्या तयारीत आहोत. महाविकास आघाडीकडून आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणून लढणार आहोत. आम्ही कोणासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं देशमुख म्हणाले.

दुबईत CBSE चं कार्यालय उघडणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा 

ते म्हणाले, आम्हाला लवकरात लवकर चिन्ह मिळावं यासाठी आम्ही आग्रही आहोत, जेणेकरून आपल्याला प्रचार करण्यास सुरूवात करता येईल, असे देशमुख यांनी सांगितलं.

तर शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, शरद पवारांनी आज सकाळी राज्याभरातील नेते, आमदार, खासदार यांची बैठक घेतली. या बैठकीत सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या प्रकरणासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आमच्या पक्षाला येत्या दोन-तीन दिवसांत पक्षाचे नाव आणि चिन्ह द्यावे, अशी आमची मागणी आहे. दुसरं असं की, शरद पवार गट काँग्रेस मध्ये विलीन होणार नाही. ज्यांना पवार साहेबांची भीती आहे, ते अशा अफवा पसरवत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube