Download App

‘….तर पुंच आणि राजौरी हे भागही पाकिस्तानात गेलं असते’; शहांना फारुख अब्दुल्लांचं उत्तर

  • Written By: Last Updated:

Farooq Abdullah :  कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कोणती विकास कामे केली? असा सवाल विरोधकांनी आज लोकसभेत विचारला. त्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात झालेल्या दोन चुकांमुळे काश्मीरला पुढची अनेक वर्ष अनेक वर्षे अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, असा दावा शाह यांनी केला. शाह यांनी नेहरूंना पीओकेसाठीही जबाबदार धरलं. त्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी शाह यांना प्रत्युत्तर दिलं.

विरोधक तीन राज्यांसारखेच पत्रकार परिषदेतही झोपले; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात 

अमित शाह यांनी केलेल्या दाव्याविषयी बोलतांना अब्दुला यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी पंडित नेहरूंनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला. लॉर्ड माउंटबॅटन, सरदार पटेल यांच्यासह सर्वांनीच हा सल्ला दिला. आता अमित शाहा जनतेशी खोटे बोलत असतील तर काय करणार? त्यावेळी भारताची परिस्थितीच अशी होती. त्यावेळी लष्कराला वळवले नसते आणि सैनिकांनी राजौरी आणि पूंछ वाचवलं. जर हे असं झालं नसतं तर पुंच आणि राजौरी हे भागही पाकिस्तानात गेलं असते. याच कारणामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे फारुख अब्दुल यांनी म्हटले आहे.

‘आता पोट वाढलं तर मी काय करु’; अजितदादांचा आव्हाडांना प्रतिसवाल 

अब्दुल्ला म्हणाले, काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण संपले आहे, असं हे सांगतात. मला सांगा तिथं किती फौजा आहेत? बीएसएफ, सीआरपीएफ आणि इतर दले. एवढ्या तुकड्या असूनही आपले सैनिक आणि अधिकारी मरत असतील तर त्याचं कारण काय? दहशतवाद संपला म्हणत आहेत मग हे का घडत आहे, असा सवालही अब्दुला यांनी विचारला.

काय म्हणाले अमित शाह?

सभागृहात चर्चेदरम्यान अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) चा मुद्दा सर्वप्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंमुळे निर्माण झाला. संपूर्ण काश्मीर हातात येण्यापूर्वीच युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. अन्यथा पीओके आज भारताचा भाग झाला असता. नेहरूंच्या चुकीमुळे काश्मीर म्हणजेच पीओके पाकिस्तानच्या अखत्यारीत आले, असं शाह म्हणाले.

 

Tags

follow us