दादा तुमचं वय झालं… म्हणत अमित शाहंनी कश्मीरच्या मुद्द्यावरून तृणमूलच्या खासदाराला सुनावलं
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या सुरू असलेल्या संस्थेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारावर चांगलेच संतापल्याच पाहायला मिळालं. याचं कारण होतं तृणमूलचे काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी भाजप सरकारच्या एक निशाण, एक प्रधान आणि एक संविधान ही घोषणा राजकीय असल्याचं आरोप केला. त्यावरून अमित शहा यांनी थेट सौगत रॉय यांचा वयच काढलं.
उद्धव ठाकरेंचा अदानी कार्यालयावर धडक मोर्चा, सरकारलाही थेट इशारा
दादा तुमचं वय झालं…
सौगत रॉय यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना आरोप केला की, भाजप सरकारचा एक निशान, एक प्रधान, एक संविधान ही घोषणा राजकीय आहे. कारण ही घोषणा पश्चिम बंगालमधून येणारे राष्ट्रीय स्वयंसेवकाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ही घोषणा दिली होती. दरम्यान यावर आक्षेप घेत अमित शहा यांनी थेट सौगत रॉय यांना चांगलंच सुनावलं.
एक देश में ‘एक निशान, एक विधान, एक प्रधान’ ही चलेगा, दो नहीं चलेंगे।
– श्री @AmitShah जी pic.twitter.com/xaJt2siD8f
— Sambit Patra (@sambitswaraj) December 5, 2023
अमित शहा यांनी म्हटलं की, ‘एका देशामध्ये दोन संविधान दोन पंतप्रधान कसे काय असू शकतात? दादा तुमचं वय झालं आहे. 1950 पासून भारतात संपूर्ण देशासाठी एकच संविधान असायला हवं. जे कश्मीरमध्ये नव्हतं मात्र नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशांमध्ये एक निशान एक प्रधान आणि एक संविधान आणला आहे.’
बीआरएसला महाराष्ट्रात पहिला धक्का, भगिरथ भालके वेगळ्या वाटेवर?
द्रमुकच्या खासदाराने टाकली वादाची ठिणगी
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान डीएमके खासदार डी.एन.वी.सेंथिलकुमार एस(D. N.V. Senthilkumar) यांनी भाजपच्या तीन राज्यांच्या एकहाती विजयावरुन टीकास्त्र सोडलं आहे. भाजपने फक्त हिंदी राज्यातील निवडणूक जिंकलीयं, त्यांना आम्ही ‘गौमुत्र’ राज्य असं म्हणतो, जनतेने याचा विचार करायला हवा, असं म्हणत त्यांनी वादाची ठिणगी टाकली आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस होता. तामिळनाडूमधील अण्णा द्रमुकच पक्षाने या वादाला सुरुंग लावलं आहे. त्यावरुन आता भाजपच्या खासदारांकडूनही संताप व्यक्त करण्यात आला आहे.