Download App

नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्याने दिला चार बछड्यांना जन्म, पाहा व्हिडिओ

Namibia Cheetah Cubs Video: नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्याने (Namibia Cheetah) ४ बछड्यांना जन्म दिला आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) यांनी दिली आहे. या बछड्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर (Social media) सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

नामिबियातून भारतात आणलेल्या चित्त्याने ४ बछड्यांना जन्म दिला आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या पथकानेही आवारात जाऊन याची पुष्टी केली. सिया बडा नंबर 4 मध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी तिने या बछड्यांना जन्म दिला.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियातून ८ चित्ते भारतात आणण्यात आले होते. १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्तांना आण्यात आले होते. यामध्ये एका मादी चितेचा सोमवारी मृत्यू झाला. ती किडनीच्या आजाराने त्रस्त होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला भारतात आणण्याअगोदरच ही समस्या होती.

Supreme Court : महाराष्ट्र सरकार नपुंसक, म्हणूनच ‘हे’ घडत आहे; कोर्टाचे ताशेरे

जानेवारीमध्ये तिला हा आजार झाल्याचे निदान झाल्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत होते, मात्र तिला वाचवता आले नाही. तेव्हापासून भारत सरकारच्या प्रोजेक्ट चित्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. दरम्यान, ४ बछड्यांच्या जन्मामुळे या प्रकल्पावर आता प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे. बछड्यांच्या जन्मावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

Tags

follow us